Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Intel | सेमीकंडक्टर उत्पादनात इंटेलची उडी, ट्वीट करत इंटेलची युनिसाठीची चाचपणी

भारत लवकरच सेमीकंडक्टर आणि चीप उत्पादनात हब होऊ शकतो. वेदांत ग्रुपनंतर आता जगप्रसिद्ध इंटेल कंपनीने ही भारतात सेमीकंडक्टर उत्पादन करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी युनिट स्थापन करण्यासाठी इंटेलची चाचपणी सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याने इंटेलच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Intel | सेमीकंडक्टर उत्पादनात इंटेलची उडी, ट्वीट करत इंटेलची युनिसाठीची चाचपणी
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 2:26 PM

मुंबई : सेमीकंडक्टर तुटवड्याची समस्या उद्भवल्यापासून भारत सरकार त्याकडे सकारात्मकतेने बघत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने पुढाकार घेत, सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोयी-सुविधा देण्यासाठी पाऊलही उचलण्यात आले होते. भारताच्या या आव्हानाला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. भारतीय कंपनी वेदांतने 60 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केल्यापाठोपाठ आता जगातील सर्वोत मोठी कंपनी इंटेलनेही भारताच्या आव्हानाला अनुकूलता दर्शवली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही अग्रगण्य कंपनी लवकरच भारतात सेमीकंडक्टकर उत्पादनात सहभागी होणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत इंटेलच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सेमीकंडक्टर आणि चीप हे  कंपोनेंट आहे जे जगातील प्रत्येक कंपनी त्यांच्या उत्पादनात  वापर करते. खास करुन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन उत्पादन कंपन्यांमध्ये सेमीकंडक्टर आणि चीपची नितांत आवश्यकता आहे. या  समस्येकडे भारत सरकारने संधी म्हणून बघितले आहे आणि सेमीकंडक्टर च्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टरचे संशोधन, विकासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्वीटर  संवादाने साद

चिप उत्पादनातील अग्रेसर अमेरिकन कंपनी इंटेलने भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी  भारतात  उत्पादन सुरु करण्याची  इच्छा व्यक्त केली आहे. भारतात लवकरच उत्पादन युनिट सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.कंपनीचे भारतातील प्रतिनिधी रंधीर ठाकूर यांनी त्यांच्या ट्वीटमधून संवाद साधत केंद्र सरकारला साद घातली आहे. देशात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इको सिस्टीमसाठी आणि हायटेक उत्पादनाचे जागतिक केंद्र होण्यासाठी तब्बल 76 हजार कोटींच्या धोरणाला मान्यता दिली आहे. सरकारच्या या पुढाकाराचे इंटेल कंपनीने स्वागत केले आहे.

लवकरच मार्गदर्शक सूचना

भारताच्या सेमीकंडक्टर हब तयार करण्याच्या आव्हानाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कंपन्या त्यासाठी इच्छुक आहे. वेदांत ग्रुपने त्यासाठी टप्प्याटप्यात 60 हजार गुंतवणुकीचा घोषणा केली आहे. तर इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगसोबतच टाटा ग्रुपनेही या प्रकल्पात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सेमीकंडक्टर आणि चीप उत्पादनासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल. त्यानंतर तीन महिन्यातच कंपन्या या प्रकल्पातंर्गत उत्पादन सुरु करण्यासाठी अर्ज दाखल करु शकतील.

अधिकृत घोषणा नाही

इंटेल कंपनीने अद्याप भारतात सेमीकंडक्टर उत्पादन सुरु करण्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र कंपनीने सेमीकंडक्टर हबमध्ये सहभागी होण्याविषयी अनुकूलता दाखवत इच्छाही व्यक्त केली आहे. मलेशियातील पेनांग येथे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी इंटेल कंपनीने यापूर्वीच 7 अरब डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारत सरकारकडून सवलतींचा पाऊस पडल्यास कंपनी भारतातही गुंतवणूक करू शकते. केंद्र सरकार अमेरिका, दक्षिण कोरीया, तैवान आणि जपानच्या सहकार्याने सेमिकंडक्टर हब तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

इतर बातम्या :

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

मुंबई-पुणेकरांना पुढील वर्षी 5G सेवा मिळणार, टेस्टिंग अंतिम टप्प्यात, 4G पेक्षा 10 पट अधिक इंटरनेट स्पीड

WhatsApp वापरताना सावधान ! ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सकडून खासगी माहितीवर हल्ला होण्याची शक्यता

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.