फोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय, टेन्शन नका घेऊ, असे करा इंटरनेट फास्ट
तुमच्या मोबाईलचे इंटरनेट जर फास्ट चालत नसेल तर काही सेटिंग्जमध्ये बदल करुन तुम्ही इंटरनेटचे स्पीड वाढवू शकता. परंतू ही समस्या नेटवर्क किंवा सिग्नल संबंधित असेल तर मात्र तुम्ही फोनच्या सेटिंगमधून बदल करून ते वाढवू शकत नाही.

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : हल्ली स्मार्टफोनने आपले विश्व अक्षरश: व्यापले आहे. आपले वीज बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग, एलआयसीचे हप्ते असं सर्वकाही आपण मोबाईलद्वारेच करीत आहोत. अशात जर तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनेट स्लो झाले तर अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परंतू आपल्या स्मार्ट फोनच्या काही सेटिंगमध्ये बदल करून आपल्या फोनचे इंटरनेट आपण सुपरफास्ट करु शकतो. तर पाहूयात कसे काय स्मार्ट फोनचे इंटरनेट फास्ट करता येईल ते…
फोन रिस्टार्ट करावा
काही वेळा नेटवर्कशी संबंधीत अडचणी आपण केवळ फोन रिस्टार्ट करून देखील दूर करू शकता. काही वेळा आपला फोन केवळ एका रिस्टार्टने देखील पूर्ववत होऊ शकतो. यामुळे फ्रेश कनेक्शन स्थापित होऊन चांगली कनेक्शन मिळून आपल्या फोनच्या इंटरनेटचे स्पीड वाढू शकते.
सिग्नल स्ट्रेंथ चेक करणे
अनेकवेळा स्लो इंटरनेटचे कारण सिग्नल असते. जर तुमच्या परिसरातच नेटवर्क कनेक्टीविटीचा इश्यू असेल तर तुम्ही फोनच्या सेटिंग बदलून इंटरनेटचा स्पीड वाढवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या सिमकार्ड कंपनीच्या इतर सिमकार्डवर नेट कसे सुरु आहे याचा पडताळा घेऊ शकता.
एअरप्लेन मोड
नेटवर्क रिसेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनला एअर प्लेन मोडवर टाकून नेटवर्क ऑन किंवा ऑफ करु शकता. यामुळे नेटवर्क रिफ्रेश होऊन जाते. त्यामुळे तुमची इंटरनेट स्लोची समस्या देखील सुटू शकते.
सॉफ्टवेअर अपडेट
अनेक वेळा स्लो इंटरनेटचे कारण तुम्ही तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट केलेले नसू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे का ? हे सतत तपासायला हवे. यामुळे बग फिक्स आणि ऑप्टमायजेशन केले जाते. त्यामुळे तुम्हाला चांगले कनेक्टीविटी मिळते.
नेटवर्क सेटिंग रिसेट
जर वरील दिलेल्या उपायांनी देखील तुमचा प्रॉब्लेम दूर होत नसेल तर आपण नेटवर्क सेटिंगला रिसेट करू शकता. परंतू नेटवर्क सेटिंगला रिसेट करताच तुमच्या मोबाईल सेटमधील सेव्ह केलेला वायफाय पासवर्ड आणि ब्ल्युटुथ पेयर्ड डिव्हाईस डिलीट होऊन जातील. या सर्व ऑप्शनचा वापर केल्यानंतरही जर तुमच्या फोनमधील इंटरनेटचे स्पीड वाढत नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनला सर्व्हीस प्रोवाइडला संपर्क करावा लागेल. यामुळे तुम्हाला योग्य माहीती मिळेल. काही वेळा तुमचे सिमकार्ड देखील बदली करावे लागू शकते.