iPhone 13 मिळतोय इतका स्वस्त, ऑफर नेमकी आहे कुठे? जाणून घ्या
iPhone 13 Offer: आयफोन 13 घेण्याची तुमची इच्छा आहे का? कारण हा स्मार्टफोन सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. अगदी अर्ध्या किमतीत आयफोन 13 ग्राहकांना घेता येणार आहे. कसं आणि काय आहे ऑफर आहे? जाणून घेऊयात
मुंबई: आयफोन सध्या एक स्टेटस सिम्बॉल असून मोबाईलप्रेमींची सर्वाधिक पसंती या हँडसेटला मिळते.आतापर्यंत आयफोनच्या 14 सीरिज (iPhone 14 Series) लाँच झाल्या आहेत. दरवर्षी लाँच होणाऱ्या नव्या सीरिजमध्ये काही ना काही नाविन्य पाहायला मिळतं. पण हा फोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल असं नाही. आयफोनसाठी चांगली रक्कम (iPhone Price) मोजावी लागते. त्यामुळे मोबाईलप्रेमी आयफोन स्वस्तात मिळेल का? यासाठी ऑफर शोधत असतात. सध्या आयफोन 14 सीरिज लाँच झाली आहे. पण तुम्हाला आयफोन 13 घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आयफोन 13 हा फोन अवघ्या 39,999 रुपयांना मिळत आहे. आयफोन 13 मध्ये आयफोन 12 च्या तुलनेत छोटा नॉच आहे. त्याचबरोबर बरेच फीचर्स तुलनेनं चांगले आहेत. खरं आयफोन सीरिजमधील आयफोन 13 हा पहिला ए15 बायोनिक चिपसेट असलेला एक फास्टेस्ट स्मार्टफोन आहे. पण हा स्मार्टफोन स्वस्तान कुठे आणि कसा मिळेल? जाणून घेऊयात ..
फ्लिपकार्टवर काय आहे ऑफर
आयफोन 13 हा फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळत आहे. या ऑफर अंतर्गत आयफोन 13 हा 39999 रुपयांना मिळत आहे. हो, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. 12 जीबी व्हेरियंट असलेल्या आयफोन 13 ची किंमत 69900 रुपये इतकी आहे. पण फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन विकत घेतल्यास सवलतीच्या दरात मिळत आहे. पण ही सवलत तुम्हाला टप्प्याटप्प्याने लागू होईल. प्राथमिक टप्प्यात हा स्मार्टफोन तुम्हाला 62999 रुपयांना मिळेल. म्हणजेच 6901 रुपयांची सवलत लागू होईल. पण बँक आणि एक्स्चेंज ऑफर जोडल्यास ही किंमत 39999 रुपयांपर्यंत येते. म्हणजेच हा स्मार्टफोन अर्ध्या किमतीत मिळेल.
एक्सचेंज ऑफर काय आहे?
फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुमच्या एक्सचेंज करण्यासाठी जुना आणि चांगल्या स्थितीतील स्मार्टफोन असेल तर 23000 रुपयांची सूट मिळेल. पण ही एक्सचेंज ऑफर स्मार्टफोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. फ्लिपकार्टवरील सवलत आणि एक्सचेंज ऑफर एकत्र केल्यास 29901 रुपयांनी आयफोन 13 ची किंमत कमी होते. म्हणजेच आयफोन 13 हा अवघ्या 39,999 रुपयांना मिळतो.
आयफोन 13 वरील बँक ऑफर
एडीएफसी कार्डवरून हा स्मार्टफोन घेतल्यास 2000 रुपयांची सूट मिळते. त्याचबरोबर ग्राहकांना कॅशबॅक कुपन मिळेल आणि ते नोव्हेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टड ईएमआयवर कोणतंही शुल्क आकारात नाही. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्ही ठरावीक पैसे भरून विकत घेऊन उर्वरित पैसे हफ्त्याने भरू शकता. यावर कोणताही व्याज भरावा लागणार नाही.