Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार
Apple कंपनीने शुक्रवारी (17 सप्टेंबर) संध्याकाळी 5:30 वाजता आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्ससाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे,
मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स दिग्गज कंपनी अॅपलने भारतासह इतर देशांसाठी iPhone 13 सिरीजचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने शुक्रवारी (17 सप्टेंबर) संध्याकाळी 5:30 वाजता आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्ससाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे, 24 सप्टेंबरपासून सर्व डिव्हाईससाठी इन- स्टोअर पिकअप सुरू केले जाणार होते, दरम्यान, भारतीय युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. (iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max shipping dates delayed up to October 30, know details)
भारतातील वापरकर्त्यांना आयफोनच्या नवीन सिरीजसाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल, अॅपलने आता भारतातील प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सच्या शिपिंगच्या तारखा 30 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. Apple India च्या ऑनलाइन स्टोअरवर आता iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी शिपिंग तारखा 25 ते 30 ऑक्टोबर दरम्यानच्या दाखवल्या जात आहेत.
तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी अजूनही 24-27 सप्टेंबरच्या नियोजित शेड्यूलसह उपलब्ध असतील. अपेक्षित आहे की पहिला आयफोन 13 मिनी, आयफोन 13, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स प्री-ऑर्डर 24 सप्टेंबर रोजी खरेदीदारांपर्यंत पोहोचतील. आयफोन 13 प्रो 1 टीबी व्हेरिएंटची अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.
iPhone 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स
नवीन आयफोन मागील मॉडेल आयफोन 12 पासून इन्स्पायर्ड आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो.
मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.
आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.
iPhone 13 सिरीजची भारतातील किंमत
अलीकडेच लॉन्च झालेला आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीची किंमत अनुक्रमे 79,900 आणि 69,900 रुपयांपासून सुरू होते. या किंमती बेस स्टोरेज मॉडेलसाठी 128GB आहेत. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स अनुक्रमे 1,19,900 आणि 1,29,900 रुपयांना उपलब्ध असतील.
नवीन iPad मिनीचे फीचर्स
आयपॅड मिनीमध्ये टॉप बटन म्हणून टच आयडीसह 8.3 इंच स्क्रीन आहे. मागील पिढीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत Apple 40 टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स आणि जीपीयू कामगिरीमध्ये मोठी उडी घेण्याचे आश्वासन देत आहे. हे A13 बायोनिक चिपसेटवर देखील चालते. IPad मिनीमध्ये आता USB-C पोर्ट आहे. आपण ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. तसेच आयपॅड 5G ला सपोर्ट करतो. IPad आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे ज्यात 4 के मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्याची प्रारंभिक किंमत $ 499 (36,742 रुपये) सुरु होते.
कसं आहे Apple Watch Series 7 लाँच?
नवीन Apple वॉच सिरीज 7 वॉचओएस 8 च्या अपडेटसह लाँच करण्यात आली आहे. वॉचओएस 8 ऑटोमॅटिक बाईक राइड आणि फॉल डिटेक्शन करेल. हे ईबाईक्सला देखील सपोर्ट करते. Apple Watch Series 7 ला नवीन डिझाईन देण्यात आलं आहे. त्याचा नवीन रेटिना डिस्प्ले वॉच सीरीज 6 पेक्षा 20 टक्के मोठा आहे. बॉर्डर 40 टक्के पातळ आहेत आणि सोप्या अॅक्सेससाठी मोठी बटणे आहेत. Apple Watch Series 7 ची किंमत $ 399 पासून (29,379 रुपये) सुरू होते.
इतर बातम्या
स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स
Flipkart Big Billion Days : Poco, Moto, Pixel फोनवर बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
वर्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस
(iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max shipping dates delayed up to October 30, know details)