Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 14 Pro Max फक्त 16,500 रुपयात! काय आहे ऑफर जाणून घ्या

जर तुम्हाला आयफोन 14 प्रो मॅक्स स्वस्तात विकत घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या साईटवर या स्मार्टफोन फक्त 16500 रुपयांना मिळत आहे.

iPhone 14 Pro Max फक्त 16,500 रुपयात! काय आहे ऑफर जाणून घ्या
iPhone14Image Credit source: Apple
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:42 PM

मुंबई : आयफोन वापरण्याची किंवा बाळगण्याची एक वेगळीच मजा आहे. पण हा स्मार्टफोन खिशाला परवडेल असं नाही. त्यामुळे अनेक जण सवलतीच्या दरात मिळेल की नाही याची वाट पाहात असतात. जर तुम्हाला सांगितलं की, आयफोन 14 प्रो मॅक्स तुमच्या बजेटमध्ये आहे. तर तुमचा विश्वास बसणार नाही. असं असलं तरी तुम्हाला हा फोन स्वस्तात घेण्याची संधी चालून आली आहे. तसंच पाहिलं तर आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत दीड लाखांच्या घरात आहे. पण हा फोन तुम्ही 16500 रुपयात खरेदी करू शकता. नेमकी काय आणि कुठे आहे ऑफर जाणून घेऊयात

अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर काही टक्के सवलत मिळेल. त्या तुलनेत फ्लिपकार्टवरून विकत घेण्यासाठी ऑफरमध्ये कमी किंमतीत मिळेल. पण आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत 16500 नक्कीच नसेल. या किमतीत तुम्ही हा फोन फेसबुक मार्केट प्लेसवरून खरेदी करू शकता. फेसबुक मार्केट प्लेसवर नुकतीच जाहीरात पोस्ट करण्यात आली आहे. यात स्मार्टफोनची किंमत 16500 इतकी आहे.

जाहीरात देणाऱ्या युजर्सने दावा केला आहे की, आयफोन 14 प्रो मॅक्स (मेड इन थायलँड) फक्त 16500 रुपयात विकत घेऊ शकता. माहितीनुसार, युजर्सकडे आयफोनचा बंपर स्टॉक आहे. त्यामुळेच आयफोनवर मोठी सवलत दिली जात आहे.  अ‍ॅपल आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये 6.7-इंचाचा सुपर XDR OLED डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 2796×1290 पिक्सेल इतके आहे. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये A16 Bionic चिपसेट देण्यात आली आहे. ही चिपसेट 6 कोर सीपीयुवर परफॉर्म करतो. या स्मार्टफोनमध्ये 128GB, 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत स्टोरेज क्षमता मिळेल.

आयफोन 14 प्रो मॅक्स फेसबुक मार्केटप्लेस

रिपोर्टनुसार, ही जाहीरात Dilaawar Sahab नावाच्या युजर्सने पोस्ट केली आहे. त्या पोस्टनुसार आयफोन 14 प्रो मॅक्सवर सवलत मिळत आहे. इतक्या मोठ्या सवलतीमुळे अनेकांच्या ऑर्डर मिळत आहेत. तुम्हीही त्या आधारे हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

(डिस्क्लेमर – फेसबुक मार्केट प्लेस हे ओपन मार्केट प्लेस आहे. येथे कोणीही जाहिराती पोस्ट करू शकते.येथून कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्याची योग्यरित्या पडताळणी करा.)

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.