AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone : डोंगरावरुन 300 फूट खाली पडली कार, जीवन मरणाच्या लढाईत, iPhone 14 ने वाचविले पती-पत्नीचे प्राण!

iPhone : एका मोठ्या अपघातात आयफोनमुळे पती-पत्नीचे प्राण वाचल्याची घटना उघडकीस आली आहे..

iPhone : डोंगरावरुन 300 फूट खाली पडली कार, जीवन मरणाच्या लढाईत, iPhone 14 ने वाचविले पती-पत्नीचे प्राण!
अन् जीव वाचलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 8:43 PM

नवी दिल्ली : Apple कंपनीमुळे अनेक लोकांचे जीवन सुखवाह झाले आहे. Apple ने असे अनेक उत्पादने आणली आहेत की, त्यामुळे लोकांचा फायदा झाला आहे, एवढेच नाहीतर त्यांचा जीव पण वाचला आहे. कंपनीच्या उत्पादनातच लाईफ सेव्हिंग फीचर आहेत. यापूर्वी कंपनीच्या Apple Watch मध्ये SOS ची सुविधा होती. आता हे फिचर iPhone 14 मध्येही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या फिचरमुळे पती-पत्नीचे एका अविश्वसनीय अपघातातून प्राण वाचल्याची (Life Saving) घटना वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे.

iPhone 14 मधील Life Saving फिचर्समुळे पती-पत्नीच्याच नाही तर त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहेत. या मोबाईलमध्ये असलेल्या अत्यावश्यक फिचरमुळे ही अविश्वसनीय घटना घडली आहे. डोंगरावरुन 300 फूटावरुन पडल्यावरही या अपघातातील पती-पत्नीचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

Montrose Research and Rescue Team ने याविषयीचे ट्विट केले आहे. त्याआधारे माध्यमांनी याविषयीचे वृत्त दिले आहे. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एंजिल्स फॉरेस्ट महामार्गावर घडली आहे. या महामार्गावरुन पती-पत्नी कारने प्रवास करत होते. त्यावेळी हा भयानक अपघात घडला.

हे सुद्धा वाचा

या अपघातात त्यांची कार डोंगरावरुन 300 फूट खोल दरीत कोसळली. त्यांची कार डोंगरात फसली होती आणि दोघेही मृत्यूच्या जबड्यात अडकले होते. मृत्यूशी त्यांची झुंज सुरु होती. त्यांच्या मोबाईलमध्ये नेटवर्कही नव्हते. त्यामुळे त्यांना कोणाला मदतीसाठी बोलविता ही येत नव्हते. त्याचवेळी iPhone 14 त्यांच्या मदतीला धावला.

iPhone 14 मालिकेतील या मोबाईलमध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध आहे. यामुळे तुमच्या कारचा अपघात झाल्यास त्याचा पडताळा करता येतो. या फिचरमुळे तुम्हाला अत्यावश्यक सेवेशी तात्काळ संपर्क साधता येतो आणि मदतीसाठी बोलाविता येते. याला Satellite SOS feature असे नाव आहे.

अपघात झाला तेव्हा iPhone ला नेटवर्क नव्हते. त्यामुळे सॅटेलाईट सेवेच्या मदतीने आपत्कालीन SOS मुळे मदत कार्य करणाऱ्या पथकाला तात्काळ घटनास्थळी धाव घेता आली. सॅटेलाईट फीचरमुळे अॅपल रिले सेंटरवर संदेश धाडला. तिथून L.A काउंटी शेरिफ डिपार्टमेंटला संपर्क साधण्यात आला. अशाप्रकारे पती-पत्नीचा जीव वाचला. याविषयीचा व्हिडिओही ट्वीट करण्यात आला आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.