iPhone 15 Apple : रुबाबात आला आयफोन, पण इतर देशांपेक्षा किंमती खरंच आहेत का स्वस्त

iPhone 15 Apple : अनेक दिवसांची उत्सुकता अखेर फळाला आली. भारतात आयफोनने डेरा टाकल्यापासून आयफोनच्या नवीन मालिकेची उत्सुकता शिगेला होती. काल हा पठ्या अखेर बाजारात उतरलाच. iPhone 15 इतर देशांपेक्षा भारतीय बाजारात स्वस्त आहे की महाग, असा सवाल आता युझर्सला पडला आहे.

iPhone 15 Apple : रुबाबात आला आयफोन, पण इतर देशांपेक्षा किंमती खरंच आहेत का स्वस्त
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 9:31 AM

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : ॲप्पल (Apple) कंपनीने भविष्यातील भारतीय बाजारपेठ हेरली आणि अगोदरच ही कंपनी देशात डेरेदाखल झाली. ॲप्पलने नवीन पिढीतील दमदार स्मार्टफोन iPhone 15 भारतीय बाजारात उतरवला. या जागतिक स्मार्टफोनमध्ये युझर्सच्या आवडी-निवडीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. iPhone 15 मालिकेत चार नवीन मॉडेल आले आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max ही खास मॉडेल बाजारात आणण्यात आली आहेत. त्यासाठी काल Apple 2023 Event पार पडली. त्यात अपग्रेडेड, नवीन दमाचा आयफोन 15 लाँच करण्यात आला. अनेक चाहत्यांनी याची देही याची डोळा त्याचे दणक्यात झालेले पदार्पण पाहिले. आयफोन 15 च्या नवीन मालिकेत काय दमदार फीचर्स आले आहेत, याची चाचपणी युझर्सनी केली. आयफोनसाठी एक पिढी वेडावलेली आहे. तर इतर युझर्सला या फोनचे आकर्षण आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण बजेटची जुळवाजुळव करत आहे. पण इतर देशांपेक्षा भारतीय बाजारात iPhone 15 खरंच स्वस्त मिळतं आहे की, युझर्सच्या खिशावर त्यामुळे भार पडत आहे?

काय आहे दावा

कंपनीच्या दाव्यानुसार, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max ला आता A17 pro chipset चे बळ देण्यात आले आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची एकूणच कामगिरी सुधारलेली आहे. तर बॅटरीची बचत होणार आहे. iPhone 15 मालिकेच्या किंमतीची यापूर्वी जोरदार चर्चा झाली. अनेकांना हा स्मार्टफोन महाग मिळेल असे वाटत होते. आता या नवीन मालिकेतील किंमती जाहीर झाल्या आहेत. प्रत्येक देशात त्याची किंमत वेगवेगळी आहे.  इतर देशांपेक्षा भारतातील या फोनच्या किंमतीत तफावत आहे. कोणत्या देशात कोणते मॉडेल स्वस्त आहे, ते आकड्यांहून स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेत काय किंमत

  • iPhone 15 : सुरुवात 799 अमेरिकन डॉलर (66234.82 रुपये)
  • iPhone 15 Plus : सुरुवात 899 अमेरिकन डॉलर (74524.54 रुपये)
  • iPhone 15 Pro : सुरुवात 999 अमेरिकन डॉलर (82814.25 रुपये)
  • iPhone 15 Pro Max : सुरुवात 1199 अमेरिकन डॉलर (99393.68 रुपये)

इंग्लंडमध्ये किती आहे नव्या दमाच्या आयफोनची किंमत

  • iPhone 15 : सुरुवात 799 पाऊंड स्टर्लिंग (82746.17 रुपये)
  • iPhone 15 Plus : सुरुवात 899 पाऊंड स्टर्लिंग (93102.39 रुपये)
  • iPhone 15 Pro : सुरुवात 999 पाऊंड स्टर्लिंग (103458.61 रुपये)
  • iPhone 15 Pro Max : सुरुवात 1199 पाऊंड स्टर्लिंग (124171.04 रुपये)

भारतात किती आहेत आयफोन नवीन मालिकेची किंमत

  • iPhone 15 : भारतात या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये
  • iPhone 15 Plus : या स्मार्टफोनच्या किंमती 89,900 रुपयांपासून सुरुवात
  • iPhone 15 Pro : किंमती 1,34,900 रुपयांपासून सुरु
  • iPhone 15 Pro Max : हा स्मार्टफोन 1,59,900 रुपयांपासून सुरुवात
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.