iPhone खरेदी करायचा, पण पैसे कमी पडतायत? मग ‘ही’ ऑफर ठरु शकते फायदेशीर

तुम्ही iPhone घेण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर तुम्हाला iPhone 16 plus हा स्वस्तात मिळू शकतो. विशेष म्हणजे यावर तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकतं, याविषयी जाणून घ्या.

iPhone खरेदी करायचा, पण पैसे कमी पडतायत? मग 'ही' ऑफर ठरु शकते फायदेशीर
आयफोन झाला स्वस्त
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:43 AM

iPhone 16 plus घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, iPhone 16 plus वर तुम्हाला चांगलं डिस्काऊंट मिळू शकतं. iPhone 16 plus हा तुम्ही स्वस्तात घरी घेऊन जाऊ शकता. आम्ही तुम्हाला iPhone 16 plus वर चांगली ऑफर्स आली आहे, याविषयीची माहिती देणार आहे, जाणून घ्या.

iPhone 16 plus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. अ‍ॅमेझॉनच्या iPhone 16 plus या फोनवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. आधी याची किंमत 89,900 रुपये होती, पण आता iPhone 16 plus ची किंमत 87,900 रुपये झाली आहे. याशिवाय तुम्हाला बँकेच्या ऑफर्सही मिळू शकतात. जाणून घेऊया सविस्तर.

iPhone 16 plus वर याशिवाय तुम्ही तुमचा जुना फोन एक्स्चेंज केल्यास किंवा बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी सूट मिळू शकते.

iPhone 16 plus वर अनेक बँक ऑफर्स

तुम्ही तुमचा जुना फोन Amazon ला विकला तर तुम्हाला 28,750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला किती सूट मिळेल हे तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असेल. तुमचा जुना फोन जितका चांगला असेल तितकी डिस्काऊंट मिळेल. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. पण ही ऑफर Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर लागू होत नाही. याशिवाय तुम्हाला कमीत कमी 53,940 रुपयांच्या वस्तू खरेदी कराव्या लागतील, तरच तुम्हाला ही सूट मिळेल.

iPhone 16 plus चे फिचर्स कोणते?

सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेला iPhone 16 plus हा अतिशय उत्तम फोन आहे. यात 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर OLED डिस्प्ले आहे, जो HDR10 आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. स्क्रीन रिझोल्यूशन 1290×2796 पिक्सल असून त्याची कमाल ब्राइटनेस 2000 निट्स आहे, जेणेकरून तुम्हाला अतिशय शार्प आणि क्लिअर पिक्चर्स आणि व्हिडिओ मिळतील.

कॅमेराही जबरदस्त

iPhone 16 plus मध्ये Apple चा A 18 चिपसेट आहे, ज्यामुळे हा फोन खूप वेगाने चालतो. यात iOS 18 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB असे तीन स्टोरेज पर्याय आहेत.

4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट

iPhone 16 plus फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असे दोन रिअर कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही अतिशय चांगल्या दर्जाचे फोटो आणि 4K व्हिडिओ काढू शकता. फ्रंट कॅमेरा 12 MP रिझोल्यूशन आहे आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी उत्तम आहे.

Face ID फीचर, Qi2 चार्जर

iPhone 16 plus हा अतिशय दमदार फोन आहे. हे पाणी आणि धुळीपासून संरक्षित आहे. यात फ्रंट आणि बॅकला Corning ग्लास देण्यात आला आहे, जो खूप मजबूत आहे. यात फेस ID फीचर आहे, आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा वापर करू शकता आणि यात Ultra Wideband सपोर्टही आहे. यात खूप चांगली बॅटरी आहे, 4674 एमएएच क्षमतेची आहे आणि फास्ट चार्ज करता येते. आपण याला MagSafe आणि Qi2 चार्जरसह चार्ज करू शकता.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....