iPhone 16 ची आली हो आनंदवार्ता; हा महागडा फोन या दिवशी तुमच्या हातात येणार, काय आहे अपडेट

Apple iPhone 16 Series : ॲप्पलच्या नव्या दमदार आयफोनची सर्वांनाच उत्सुकता आहे. आयफोन 16 हातात घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन 16 ची नवीन मालिका या दिवशी बाजारात येत आहे. हा फोन या दिवशी तुम्हाला हाताळता येणार आहे.

iPhone 16 ची आली हो आनंदवार्ता; हा महागडा फोन या दिवशी तुमच्या हातात येणार, काय आहे अपडेट
आयफोन 16 चा उत्सुकता शिगेला
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 3:40 PM

ॲप्पलच्या नव्या दमदार आयफोनची सर्वच मोबाईल प्रेमींना उत्सुकता आहे. आयफोन 16 सीरीज लवकरच लाँच होत आहे. त्यानंतर या स्मार्टफोनची विक्री होणार आहे. या नवीन आयफोनमध्ये अनेक दमदार फीचर्सची रेलचेल असेल. त्यामुळे हा फोन कधी बाजारात येतो असे आयफोनच्या चाहत्यांना झाले आहे. तुम्ही हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साईट आणि इतर ई-कॉमर्सवर खरेदी करु शकता. काय आहे याविषयीची अपडेट? कधी येणार हा फोन बाजारात?

आयफोन 16 या दिवशी येणार बाजारात

आयफोन 16 सीरीज लाँच झाल्यानंतर ग्राहकांना त्याच्या विक्रीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. आयफोन 16 लवकरच Apple च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि ई-कॉमर्स साईटवर मिळेल. अथवा या ठिकाणी ग्राहकांना खरेदीसाठी प्री-बुकिंगचा पर्याय उपलब्ध होईल.

हे सुद्धा वाचा

iPhone 16 चे फीचर्स काय

आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस मध्ये तुम्हाला जवळपास सर्वच फीचर्स मिळतील. पण या फोनमध्ये बॅटरी आणि डिस्प्लेचा आकार वेगवेगळा असेल. हे दोन्ही मॉडेलमध्ये नवीन A18 चिपसेट असेल. चिपसेट A16 Bionic च्या तुलनेत ही नवीन चिफसेट 30 टक्के अधिक जलद आहे. या नवीन स्मार्टफोनचा GPU गेल्या मॉडेलच्या तुलनेत 40 टक्के अधिक गतिमान आहे.

iPhone 16 चा कॅमेरा

ॲप्पलच्या नवीन सीरीजमध्ये तुम्हाला फोटो व्हिडिओग्राफीविषयी कोणतीही चिंता नसेल. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल तर मागील बाजूस रिअरमधील प्रायमरी कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. आयफोनमध्ये चाहत्यांना सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

आयफोन 16 सीरीज किंमत

ॲप्पलने iPhone 16 ला बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उतरवले आहे. हे तीनही मॉडलचे तुम्हाला लवकरच दर्शन होईल. आयफोन 16 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. तर 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 89,900 रुपये आहे. जर तुम्हाला जास्त स्टोरेजचा आयफोन खरेदी करायचा असेल तर हा पर्याय पण उपलब्ध आहे. आयफोन16 चा 512GB व्हेरिएंट खरेदीसाठी तुम्हाला 1,09,900 रुपये मोजावे लागतील.

iPhone 16 शिवाय तुम्हाला आयफोन 16 पल्स खरेदीसाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात तीन स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत. 128GB व्हेरिएंट 89,900 रुपये, 256GB स्टोरेज व्हेरिएंट 99,900 रुपये आणि 512GB स्टोरेजचे मॉडेल 1,19,900 रुपयांना मिळते. प्री- ऑर्डर आणि विक्रीसाठी 13 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. 13 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपासून नवीन आयफोन 16 सीरीजची प्री बुकिंग करता येईल.

गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.