जगातला सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन 11 जानेवारीला लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे की, iQOO7 हा जगातील सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन आहे.

जगातला सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन 11 जानेवारीला लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 3:10 PM

मुंबई : IQOO7 या स्मार्टफोनचा काही दिवसांपूर्वी एक टीझर लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या फोनबाबत युजर्समध्ये उत्सूकता होती. आता कंपनीने या फोनचा अजून एक टीझर लाँच केला आहे. त्यामध्ये या मोबाईलची लाँचिंग डेट जाहीर करण्यात आली आहे. हा फोन 11 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता लाँच केला जाणार आहे. जुन्या टीझरमध्ये iQOO 7 BMW एडिशनच्या ऑफिशियल पोस्टरची एक झलक पाहायला मिळाली होती. या पोस्टरमध्ये फोनचा रियर कॅमेरा आणि स्पेशल कलर एडिशनची माहिती देण्यात आली होती. (iQOO 7 with Snapdragon 888 SoC confirmed for January 11 launch)

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे की, iQOO7 हा जगातील सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन आहे. या फोनला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे अवघ्या 15 मिनिटात चार्ज होईल. तसेच टिपस्टरने म्हटलं आहे की, iQOO 7 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, त्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर असेल जो OIS सपोर्टसह मिळेल.

फोनमधील इतर फिचर्स

या फोनमध्ये युजर्सना एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो स्टँडर्ड पंच होल आणि स्नॅपड्रॅगन 888 SoC सह मिळेल. हा फोन ओरिजिन OS आधारित अँड्रॉयड 11 आऊट ऑफ दी बॉक्सवर काम करेल. फोनच्या बॅटरीसह फिचर्सबाबतची माहिती मिळाल्यापासून ग्राहक या फोनच्या लाँचिंगची आतुरतेने वाट पाहात आहेत. फोनची लाँचिंग डेट जाहीर होण्यापूर्वीच लीक्सच्या माध्यमातून फोनमधील फिचर्स समोर आले होते.

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

टेक्नोने (Tecno) गेल्या आठवड्यात त्यांचा किफायतशीर स्मार्टफोन Tecno Spark 6 Go भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच आणि डुअल रियर कॅमरा सेटअपने लेस आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB RAM + 64 GB स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत 8,699 रुपये आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर 40 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम किंवा 54 तासांचा टॉक-टाइम प्रदान करतो. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर विक्रीस उपलब्ध आहे. तसेच 7 जानेवारीपासून तुम्ही हा स्मार्टफोन ऑफलाईन स्टोरमधूनही खरेदी करु शकाल. या फोनवर सध्या कंपनीने इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून 200 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे हा फोन फ्लिपकार्टवरुन 8,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Tecno Spark 6 Go 5000 mAh octa core MediaTek Helio A25 SoC

Tecno Spark 6 Go स्मार्टफोन्सची फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचांचा HD+ TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचे रिझॉल्युशन 720×1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये octa core MediaTek Helio A25 SoC प्रोसेसर आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh इतकी आहे. तसेच यामध्ये ड्युअर रियर कॅमेरा सेटअपची सुविधा असून प्रायमरी सेंसर 13 मेगापिक्सल इतका आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Aqua Blue, Ice Jadeite आणि Mystery White या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

(iQOO 7 with Snapdragon 888 SoC confirmed for January 11 launch)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.