AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iQOO 9T 5G लाँच, अवघ्या 20 मिनिटांत चार्ज होणार हा पॉवरफुल फोन, OnePlus ला देणार तगडी टक्कर !

iQOO 9T 5G हा स्मार्टफोन 120 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट सह लाँच करण्यात आला आहे. या नव्या आयकू मोबाईल फोनमध्ये तुम्हाला फ्लॅगशिप प्रोसेसर आणि उत्तम कॅमेरा सह अनेक वैशिष्ट्ये पहायला मिळतील.

iQOO 9T 5G लाँच, अवघ्या 20 मिनिटांत चार्ज होणार हा पॉवरफुल फोन, OnePlus ला देणार तगडी टक्कर !
iQOO 9T 5G लॉन्चिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:07 PM

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आयकूने (iQOO) भारतीय ग्राहकांसाठी फ्लॅगशिप फीचर्ससह आयकू 9टी (iQOO 9T 5G) हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे या नव्या फोनमध्ये क्वालकॉम ब्रँडचा एक तगडा प्रोसेसर (processor) दिला आहे. त्यासोबतच 120 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट आणि ई5 एमोलेड डिस्प्ले यासारखे अनेक उत्तम फीचर्स (many feature) पहायला मिळतील. कंपनीचा असा दावा आहे की, अवघ्या 20 मिनिटांत ह्या फोनची बॅटरी 100 टक्के (100% charging in 20 minutes) चार्ज होऊ शकते. आयकूच्या या नव्या, ‘आयकू 9टी’ स्मार्टफोनची भारतात किंमत किती, त्याचे फीचर्स काय आहेत आणि तो विक्रीसाठी बाजारात कधी उपलब्ध होईल, याची माहिती जाणून घेऊया.

iQoo 9T 5G फोनचे स्पेसिफिकेशन काय आहे ?

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर : या आयकू स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचांचा फुल-एचडी प्लस ई5 एमोलेड (1080 x 2400 पिक्सल) डिस्प्ले आहे. जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500 निट्स पीक ब्राइनटेस ऑफर करतो. हा फोन एचडीआर10प्लस सपोर्ट ऑफर करतो. हा फोन ॲंड्रॉइड 12 वर आधारित फनटच ओएस 12 नुसार काम करतो.

कॅमेरा : आयकू 9टी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल ISOCELL GN5 प्रायमरी कॅमेरा, त्यासोबत 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढल्या पॅनेलवर 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

हे सुद्धा वाचा

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंग यासाठी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरेश 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनमध्ये तुम्हाला लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी वापरलेली दिसेल. ही टेक्नॉलॉजी, गेम खेळताना फोनमध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करण्याचे काम करते.

बॅटरी : 120 वॉट फ्लॅशचार्ज सपोर्टसह 4700 एमएएचची बॅटरी फोनमध्ये वापरण्यात आली आहे. याबाबत आयकू कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की सुमारे 08 मिनिटांत हा फोन 50 टक्के चार्ज होतो. तर 100 टक्के चार्जिंगसाठी अवघी 20 मिनिटे पुरतात.

कनेक्टिव्हिटी : आयकू 9टी 5 जी या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, 5 जी , जीपीएस, ओटीजी, एफएम रेडिओ, 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट, यासारखे अनेक फीचर्स दिसतील. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून (सिक्युरिटी) फोनमध्ये इन-डिस्प्ले फिगरप्रिंट सेन्सर बसवण्यात आला आहे.

iQOO 9T ची भारतातील किंमत

या आयकू मोबाईलच्या 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आजपासून ( 2 ऑगस्ट) तर ॲमॅझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाईटवर 4 ऑगस्टपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयकू 9टी हा फोन ब्लॅक (अल्फा) आणि व्हाइट या रंगांत उपलब्ध होईल.

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.