7300mAh बॅटरी-AIफीचर्स आणि दमदार प्रोसेसर असलेला ‘हा’ नवीन फोन भारतात लाँच
भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी iQOO Z10x आणि iQOO Z10 हे दोन नवीन स्मार्टफोन उत्तम फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्हीही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील या दोन्ही नवीनतम स्मार्टफोन्सची किंमत, विक्रीची तारीख, लाँच ऑफर्स आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात...

भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी iQOO Z10 आणि iQOO Z10x हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. तर या नवनीतम स्मार्टफोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Z9 चे हे अपग्रेडेड मॉडेल 7300mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह लाँच करण्यात आले आहे, या फोनसोबत AI नोट असिस्ट, AI सर्कल टू सर्च, AI सुपर डॉक्युमेंट, AI इरेज सारखे अद्भुत फीचर्स देखील देण्यात आले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये कोणते खास फीचर्स दिले आहेत ते आपण जाणून घेऊयात…
iQOO Z10 चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: या फोनला 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.77-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7एस जनरेशन 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आलेला आहे.
बॅटरी: या फोनला कंपनीकडून 7300 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 90 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z10x स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या मोबाईलमध्ये240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1050 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.72 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
चिपसेट: या नवीनतम फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आलेला आहे.
कॅमेरा: या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास , यामध्ये फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 2 मेगापिक्सेल बोकेह कॅमेरा, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: फोनला 6500mAh बॅटरी देण्यात आलेली आहे जी 44 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z10x ची भारतातील किंमत
या फोनच्या 6 जीबी रॅम / 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये, तर 8 जीबी / 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8 जीबी / 256 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 16,499 रुपये आहे. हा फोन खरेदी करताना बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच या फोनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटची विक्री 22 एप्रिलपासून कंपनीच्या साइट आणि अमेझॉनवर सुरू होईल.
iQOO Z10 ची भारतातील किंमत
या iQOO मोबाईल फोनच्या 8 जीबी / 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तसेच या फोनच्या दुसऱ्या 8 जीबी / 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आणि 12 जीबी / 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 16 एप्रिलपासून कंपनीच्या अधिकृत साइट आणि अमेझॉनवर सुरू होईल. हा फोन खरेदी करताना, जुना फोन एक्सचेंज केल्यावर 2000 रुपयांची सूट मिळेल.