Realme, Redmi, Samsung ला टक्कर, iQoo चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि ढासू स्पेक्स

विवोपासून विभक्त झालेला ब्रँड iQoo ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाईल फोनचे नाव iQoo Z5 Cyber ​​Grid Edition असे आहे.

Realme, Redmi, Samsung ला टक्कर, iQoo चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि ढासू स्पेक्स
Iqoo Z5 Cyber Grid Edition
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 4:24 PM

मुंबई : विवोपासून विभक्त झालेला ब्रँड iQoo ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाईल फोनचे नाव iQoo Z5 Cyber ​​Grid Edition असे आहे. हा फोन iQoo Z5 सिरीजचा एक भाग आहे, जो या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च झाला होता. हे डिव्हाईस मिस्टिक स्पेस आणि आर्क्टिक डॉन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. (iQoo Z5 Cyber ​​Grid Edition with awesome features, will compete with Realme, Redmi, Samsung in market)

iQoo Z5 सायबर ग्रिड एडिशन दोन कॉन्फिगरेशन व्हेरिएंटमध्ये सादर केले गेले आहे, त्यापैकी एक 8GB + 128GB व्हेरिएंट आहे आणि त्याची किंमत 23,990 रुपये आहे, तर 12GB + 256GB व्हेरिएंट 26,990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. iQoo चा हा लेटेस्ट मोबाईल Amazon वरून विकत घेता येईल. अमेझॉनवर 8 जीबी रॅम व्हेरिएंटवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे. iQoo चा हा स्मार्टफोन Realme, Redmi आणि Samsung च्या मिड रेंज स्मार्टफोन्सना बाजारात जोरदार टक्कर देईल, अशी कंपनीला आशा आहे.

iQoo Z5 Cyber Grid Edition चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQoo Z5 Cyber Grid Edition युनिक बॅक डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ग्रिड डिझाइन आहे, जे गुलाबी आणि निळ्या रंगात येते. डिझाईन आणि कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनचे स्पेसिफिकेशन जवळपास जुन्या व्हेरिएंटसारखेच आहेत. iQoo च्या या डिव्हाईस मध्ये Snapdragon 778 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 44W फ्लॅश चार्ज सपोर्ट आहे. तसेच, या फोनमध्ये 28837mm2 VC लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.

iQoo Z5 Cyber Grid Edition चा डिस्प्ले

iQoo च्या या मोबाईलमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याला 20:9 अॅस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव सुधारतो. तसेच, यात 240hz चा टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे.

iQoo Z5 Cyber Grid Edition चा कॅमेरा

कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास iQoo Z5 Cyber ​​Grid Edition मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, ज्यामध्ये f/1.79 अपर्चर देण्यात आले आहे. याशिवाय, यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे, जो एक सेकेंडरी कॅमेरा आहे. यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

iQoo Z5 Cyber Grid Edition कनेक्टिव्हिटी

सुरक्षेच्या दृष्टीने या मोबाईलमध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करण्याचे काम करतो. याशिवाय, यात व्हर्च्युअल रॅम, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, अँड्रॉइड 11 ओएस आणि 3.5 मिमी ऑडिओ सपोर्ट जॅक आहे.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(iQoo Z5 Cyber ​​Grid Edition with awesome features, will compete with Realme, Redmi, Samsung in market)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.