स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स
iQOO ने अखेर भारतातील त्यांच्या पुढील स्मार्टफोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. IQOO Z5 27 सप्टेंबरला लॉन्च होईल असे कंपनीने म्हटले आहे.
मुंबई : iQOO ने अखेर भारतातील त्यांच्या पुढील स्मार्टफोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. IQOO Z5 27 सप्टेंबरला लॉन्च होईल असे कंपनीने म्हटले आहे. हे लाँचिंग सोमवारी दुपारी 12:00 वाजता सुरु होईल. कंपनीने केवळ या फोनच्या लॉन्चची तारीख उघड केली आहे, मात्र याचे फीचर्स किंवा किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स बद्दल थोडीफार माहिती समोर आली आहे. (IQOO Z5 to launch in India on September 27, will come with Snapdragon 778G, 120 Hz display)
iQOO Z5 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह येईल. याशिवाय यात UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम असेल. यापूर्वी Weibo वर iQOO द्वारे शेअर केलेला फोटो डिव्हाइसचं पुढील पॅनेल दर्शवतो, या फोनच्या डिस्प्लेच्या मध्यभागी पंच-होल सेल्फी कॅमेरासह सर्व बाजूंनी अतिशय पातळ बेजल्स आहेत. व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण नवीन iQOO स्मार्टफोनच्या उजव्या कोपऱ्यात दिसू शकतात.
iQOO Z5 मध्ये Z3 च्या तुलनेत काही ऑडिओ सुधारणा पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह हाय रेस ऑडिओ वायरलेसला सपोर्ट करेल.
IQOO Z5 च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 120Hz रिफ्रेश रेटसह कर्व्ड फुल-एचडी+ डिस्प्ले समाविष्ट करण्याची अफवा आहे. 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह मागील बाजूस ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप असू शकतो. हे डिव्हाइस अँड्रॉइड 11 वर काम करते आणि 8 जीबी रॅमसह येऊ शकते. 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 5,000mAh बॅटरी देखील असू शकते.
कंपनी या फोनचे लो-बजेट व्हेरिएंट लॉन्च करू शकते, ज्याचे नाव iQOO Z5x असेल. स्मार्टफोन 120Hz ऐवजी 90Hz AMOLED डिस्प्ले आणि iQOO Z5 वर स्नॅपड्रॅगन चिपसेटच्या जागी MediaTek Dimensity 900 सह लाँच होऊ शकतो. याशिवाय, कंपनी येथे स्टेप-अप व्हेरिएंट देखील देऊ शकते, ज्यामध्ये उत्तम कॅमेरा आणि डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
इतर बातम्या
65 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह मिळणार वनप्लस 9 आरटी, 3 सी सूचीमध्ये फोनचे तपशील उघड
आता व्हॉट्सअॅपवर फोटोला स्टिकर्समध्ये कनवर्ट होणार, लवकरच येणार नवीन फीचर
आयफोन 12 खरेदी करण्याची उत्तम संधी, आयफोन मूळ किंमतीपेक्षा 15,000 रुपये स्वस्त
(IQOO Z5 to launch in India on September 27, will come with Snapdragon 778G, 120 Hz display)