AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

जगभरातले युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला डावलून सिग्नल अ‍ॅपकडे वळलेले असताना एका देशात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. (Iran blocks Signal after WhatsApp users migrate)

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, 'या' देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 6:37 PM

मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप (Signal Messaging app) मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत. (Iran blocks Signal after WhatsApp users migrate to open source Messaging app)

जगभरातले युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला डावलून सिग्नल अ‍ॅपकडे वळलेले असताना एका देशात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या देशात सिग्नल अ‍ॅपवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. या देशाचं नाव आहे इराण. या देशातले युजर्सही व्हॉट्सअ‍ॅपऐवजी सिग्नल अ‍ॅपचा वापर करु लागले होते, अशातच सरकारच्या या निर्णयाने सिग्नल अ‍ॅप आणि त्यांच्या इराणी वापरकर्त्यांना (युजर्सना) दणका बसला आहे.

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार इराणमधील वापरकर्त्यांना (युजर्सना) सिग्नल मेसेजिंग अ‍ॅपपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सिग्नल हे ओपन-सोर्स मेसेजिंग अ‍ॅप त्यांचे प्रतीस्पर्धी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सपेक्षा अधिक सुरक्षेचं आणि गोपनीयतेचं आश्वासन देत आहे. तरीदेखील इराणी सरकारणी सिग्नल अ‍ॅप कायमस्वरुपी ब्लॉक केलं आहे.

बॅनबाबतची माहिती मिळताच सिग्नलने याबाबत म्हटलं आहे की, “आमच्या अ‍ॅपने प्ले स्टोरवर पहिला नंबर मिळवल्यानंतर आमचं अ‍ॅप सरकारच्या ब्लॉक लिस्टमध्येदेखील पहिल्या नंबरवर आलं आहे. आम्ही सध्या सेन्सरशिपवर काम करतोय. आम्ही रजिस्ट्रेशन थांबवू शकत नाही. IR सेन्सर्स आता सिग्नलचं सर्व ट्रॅफिक ड्रॉप करत आहेत. इराणच्या लोकांना गोपनीयतेचा (प्रायव्हसी) हक्क आहे. अशा परिस्थितीत आम्ही इतक्या लवकर हार मानणार नाही.”

इराणी सरकारने 14 जानेवारीला कॅफे बाजारला आदेश दिला होता की, त्यांनी सिग्नल अ‍ॅप हटवावं. कॅफे बाजार हे इराणमध्ये हे गुगल प्ले स्टोअरप्रमाणे काम करतं. अहवालात असे म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा वापरकर्ता (युजर) सिग्नल अ‍ॅप वापरण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा त्याला संदेश येत होता की, “आम्हाला तुमच्या अ‍ॅपची मर्यादा समजली आहे.” या संदेशातून नेमकी अडचण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

इराणमध्ये सिग्नलसमोर काही समस्या उद्भवल्या आहेत, परंतु ही काही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये इराणी सरकारने हे अॅप ब्लॉक केलं होतं. परंतु त्या काळात सिग्नलकडे आत्तासारखा डेटाबेस नव्हता. हे मेसेजिंग अ‍ॅप कोणत्याही कारणाशिवाय ब्लॉक करण्यात आलं आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

(Iran blocks Signal after WhatsApp users migrate to open source Messaging app)

'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.