AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा iPhone खरा आहे की बनावट? फक्त ‘या’ ५ ट्रिक्सने ओळखा

iPhone खरेदी करताना उत्साहात गाफील राहू नका. या पद्धती वापरून तुम्ही केवळ काही मिनिटांत iPhone खरा आहे की बनावट हे ओळखू शकता. त्यामुळे iPhone खरेदी करताना या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि बनावट iPhone पासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

तुमचा iPhone खरा आहे की बनावट? फक्त 'या' ५ ट्रिक्सने ओळखा
iphone
Follow us
| Updated on: Apr 24, 2025 | 12:14 PM

आजच्या काळात iPhone हे केवळ स्मार्टफोन नसून एक स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. त्याची कामगिरी, कॅमेरा, आणि सिक्युरिटी फीचर्समुळे अनेकजण iPhone खरेदी करत आहेत. मात्र या मागणीनं बनावट iPhone च्या विक्रीलाही चालना दिली आहे. विशेषतः ऑफलाइन बाजारात अनेकदा ग्राहक नकली iPhone घेतात आणि नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. म्हणून iPhone खरेदी करताना काही खास गोष्टी तपासणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया iPhone खरा आहे की बनावट, हे ओळखण्याच्या ५ महत्वाच्या आणि सोप्या ट्रिक्स.

१. Siri टेस्ट

Apple चं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या Siri या व्हॉईस असिस्टंटला बनावट iPhone मध्ये योग्य प्रतिसाद देणं शक्य होत नाही. त्यामुळे iPhone मध्ये “Hey Siri” म्हणत हवामान, वेळ, अलार्म अशा साध्या गोष्टी विचारून तपासणी करा. जर Siri नी लगेच आणि योग्य प्रतिसाद दिला नाही, तर हा फोन खोटा असण्याची दाट शक्यता आहे.

२. Apple च्या वेबसाइटवर Serial Number तपासा

प्रत्येक iPhone चा स्वत:चा सीरियल नंबर असतो. तो तुम्ही Settings मध्ये जाऊन मग General वर क्लिक करुन About मध्ये जाऊन पहाता येऊ शकतो. तो “Check Coverage – Apple” या अधिकृत वेबसाइटवर टाका. जर “Invalid Serial Number” असा मेसेज आला, तर फोन खोटा आहे आणि “valid Serial Number” आला तर तो iphone खरा आहे

३. फोनमधील फीचर्सची टेस्ट

बनावट iPhone मध्ये जॅमरोस्कोप, कंपास, अशा हार्डवेअर फीचर्सचा अभाव असतो. त्यामुळे “Sensor Test” किंवा “Gyroscope Test” अॅप्स डाउनलोड करून फोनमधील सेन्सर्सची कामगिरी तपासू शकता. जर हे फीचर्स योग्य प्रकारे काम करत नसतील, तर फोन बनावट असण्याची शक्यता आहे.

४. iTunes/Finder टेस्ट

iPhone खराखुरा असेल तर तो कॉम्प्युटरशी iTunes किंवा Finder वर लगेच कनेक्ट होतो. जर तुमचा डिव्हाइस डिटेक्ट होत नसेल, तर तो फेक असू शकतो. हा एक सोपा पण प्रभावी टेस्ट आहे जो तुम्ही सहज रित्या करु शकता

५. मेजर अॅप (Measure App)

Apple चं “Measure” अॅप केवळ खऱ्या iPhone मध्येच AR तंत्रज्ञानाद्वारे योग्य काम करतं. हे अॅप फोनमध्ये आधीपासून असतं किंवा App Store वरून डाउनलोड करता येतं. जर हे अॅप नसेल किंवा डाऊनलोड करुनही काम करत नसेल, तर तुमचा iPhone बनावट असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.