तुमचं WhatsApp अकाउंट सुरक्षित आहे का? कसे तपासावे जाणून घ्या

WhatsApp privacy checkup : व्हॉट्सअप तर सगळेच जण वापरतात. पण अनेकांना आपलं व्हॉट्सअप सुरक्षित आहे की नाही हेच माहित नसतं. यासाठी कंपनीकडून पर्याय देण्यात आला आहे. तुमचे अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे. काय आहे सेटिंग जाणून घ्या.

तुमचं WhatsApp अकाउंट सुरक्षित आहे का? कसे तपासावे जाणून घ्या
WhatsApp Feature
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 4:11 PM

Whats App security : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारे सोशल APP आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे. सगळेच जण त्याचा वापर करतात. यासाठी कंपनी देखील युजर्सला नवीन नवीन फीचर्सचा अनुभव देत असते. कंपनी युजरच्या सुरक्षिततेसाठी आणि गोपनीयतेसाठी अनेक पाऊलं देखील उचलत आहे. व्हॉट्सअप अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असतात. मेटाने नुकतेच प्रायव्हसी चेकअप फीचर आणले आहे. यामुळे युजर्स त्यांचा डेटा अधिक सुरक्षित करु शकतात.

एका ब्लॉग पोस्टनुसार, Whats App प्रायव्हसी चेकअप फीचर युजर्सला सेटिंग्जमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गोपनीयता पर्यायांची माहिती देते. युजर त्यांच्या गोपनीयतेच्या संदर्भात त्यांच्या इच्छेनुसार संरक्षण पाहू शकतात. याशिवाय युजर्स इतरांसोबत काय शेअर करायचे आहे यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात.

सर्वप्रथम प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन ‘स्टार्ट चेकअप’ या पर्यायावर क्लिक करा. हे तुम्हाला एका स्क्रीनवर घेऊन जाईल जिथे तुम्ही तुमच्याशी कोण संपर्क साधू शकेल, कोण तुम्हाला गटांमध्ये जोडू शकेल आणि तुम्ही कोणाला ब्लॉक केले आहे हे निवडू शकता.

तुम्ही तुमची अनेक वैयक्तिक माहिती येथे संपादित करू शकता. जसे की प्रोफाईल फोटो, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस आणि रीड रिसिप्ट्स.

हे गोपनीयतेचे पर्याय WhatsApp वर उपलब्ध आहेत.

Silence unknown callers

सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. अकाउंट वर क्लिक करुन प्रायव्हसी वर टॅप करा. खाली स्क्रोल करा आणि ब्लॉक केलेले संपर्क टॅप करा. आता वरच्या उजव्या कोपर्यावर टॅप करा. आता तुमच्या संपर्कांमधून अज्ञात निवडा. आता ब्लॉक वर टॅप करा.

स्क्रीन लॉक एनेबल करण्यासाठी

सेटिंग्जमध्ये खात्यावर टॅप करून प्रायव्हसी निवडा. खाली स्क्रोल करा आणि स्क्रीन लॉक टॅप करा. अनलॉक करण्यासाठी फेस आयडी/टच आयडी टॉगलवर टॅप करा. जर तुम्हाला काही काळ स्क्रीन लॉक करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी कालावधीचा पर्याय देखील मिळेल.

Two-factor authentication (2FA) कसे सुरु करायचे

सेटिंग्ज वर जा. खात्यावर टॅप करून Two-factor authentication उघडा. आता द्वि-चरण सत्यापन सक्षम करा. आता 6-अंकी पिन प्रविष्ट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. तेथे तुमचा ईमेल भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला मेलवर एक ओटीपी प्राप्त होईल. तोच कोड WhatsApp वर टाका आणि Next वर क्लिक करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.