स्वस्तात मस्त…जिओचा हा प्लान 101 रुपयांनी झाला स्वस्त; एकाचवेळी 2 यूजर्सना मिळू शकतो फायदा

Reliance Jio Family Plans: रिलायन्स जिओने नुकताच युजर्ससाठी 399 रुपयांचा नवीन प्लान लॉन्च केला आहे. कंपनीच्या सध्याच्या 599 रुपयांच्या प्लॅनसोबत या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांची तुलना करून पाहूया.

स्वस्तात मस्त...जिओचा हा प्लान 101 रुपयांनी झाला स्वस्त; एकाचवेळी 2 यूजर्सना मिळू शकतो फायदा
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 3:20 PM

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) हे देशात सर्वाधिक वापरलं जाणारं नेटवर्क आहे. त्यामुळे स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात प्रत्येक युजर असतो. जिओच्या प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी (users) अनेक उत्तम योजना आहेत. अलीकडेच, Jio ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फॅमिली प्लॅन (Jio Family Postpaid Plans) लॉन्च केला आहे. कंपनीच्या सध्याच्या प्लॅनच्या तुलनेत, Jio चा नवीन पोस्टपेड प्लॅन किती फायदेशीर ठरू शकतो, ते जाणून घेऊया.

Jio 399 Plan Details

Jio ने काही काळापूर्वी यूजर्ससाठी नवीन फॅमिली प्लॅन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 399 रुपये आहे. या पोस्टपेड प्लॅनसह, तुम्ही 3 अतिरिक्त कनेक्शन घेऊ शकता, परंतु प्रत्येक कनेक्शनसाठी तुम्हाला 99 रुपये खर्च करावे लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही 1 कनेक्शन अतिरिक्त घेतल्यास, यासाठी एकूण किंमत 498 रुपये असेल (399 रुपयांसह तुम्हाला एका कनेक्शनसाठी आणखी 99 रुपये खर्च करावे लागतील).

हे तर झालं किंमतीबाबत, आता आपण या प्लॅनद्वारे मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती जाणून घेऊया. या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून 75 GB हायस्पीड डेटा मिळेल, तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससह 1 महिन्याची मोफत ट्रायल सुविधा मिळेल.

मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये तुम्हाला 500 रुपये सुरक्षा ठेव (security deposit) भरावी लागेल. तसेच या प्लॅनसह तुम्हाला Netflix किंवा Amazon Prime Video चा लाभ मिळणार नाही.

Jio 599 Plan Details

तर दुसरीकडे, जर कंपनीच्या सध्याच्या 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना या प्लॅनमध्ये 2 कनेक्शन मिळतात, परंतु 399 रुपयांच्या प्लॅनपेक्षा या प्लॅनमध्ये जास्त डेटा दिला जातो. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 GB हाय स्पीड डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधेचा लाभ मिळतो.

(Photo : Reliance jio)

Jio 399 Plan vs Jio 599 Plan: दोघांमध्ये काय फरक आहे ?

399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 99 रुपये अतिरिक्त खर्च करून म्हणजेच एकूण 498 रुपये खर्च करून, 2 लोक प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांचा लाभ घेऊ शकतात. तर दुसरीकडे, 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 फॅमिली कनेक्शन देखील उपलब्ध आहेत म्हणजेच 399 रुपयांचा प्लॅन 599 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 101 रुपये स्वस्त आहे.

नाही वाढणार Jio Tariff

सध्या असं दिसतंय की रिलायन्स जिओने देखील एअरटेलचा मार्ग अवलंबला आहे कारण असे म्हटले जात होते की कंपनी आपल्या एंट्री लेव्हल प्लॅनचे शुल्क 50% ने वाढवणार आहे, परंतु आता मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर येत असलेल्या माहितीनुसार ही दरवाढ पुढे ढकलली जाऊ शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.