सामान्यांना दणका, मोबाईल रिचार्ज आणखी महागणार? Airtel, Jio, Vi लवकरच…
देशातील जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या प्रमुख टेलकॉम कंपन्यांनी याआधी जुलै 2024 मध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती.

Recharge Plan Cost May Increase : मोबाईलचे रिचार्ज महागले आहेत, असे अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होणे जवळपास अशक्य असल्यामुळे काहीही झालं तरी लोक रिचार्ज करतातच. रिचार्जचा दर हा कमी केला पाहिजे, अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. असे असतानाच आता टेलकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत आहेत. एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया यासरख्या टेलकॉम कंपन्या लवकरच आपले रिचार्ज प्लॅन आणखी महाग करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी कधी झाली होती लाढ?
देशातील जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या प्रमुख टेलकॉम कंपन्यांनी याआधी जुलै 2024 मध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. तेव्हापासून लोकांना अतिरिक्त पैसे देऊन इंटरनेट आणि कॉलिंग पॅक घ्यावे लागत आहेत. त्यानंतर आता आणखी एकदा या टेलकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास भविष्यात मोबाईल रिचार्ज आणखी महागणार आहे.
रिचार्ज प्लॅनच्या किमतीत कधी वाढ होणार?
मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत टेलकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या रिचार्जचे प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे.
रिचार्ज प्लॅनची किंमत का वाढणार?
देशभरात 5 जी सर्व्हिस चालू झाल्यामुळे सर्वच टेलकॉम कंपन्यांनी जुलै 2024 मध्ये रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर 5 जी नेटवर्कचा विस्तार आणि वाढता तांत्रिक खर्च यामुळे पुन्हा एकदा रिचार्जचे प्लॅन वाढवले जातील, असे सांगण्यात येत आहे. सोबतच टेलकॉम कंपन्या स्पेक्ट्रक खरेदी आणि पायाभूत सुविधा यासाठी लागणारा खर्च भरून निघावा यासाठीही रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये रिचार्ज प्लॅन्सच्या किंमत वाढीचा फटका बसू शकतो.