मुकेश अंबानी यांनी उडवली Google ची झोप, कोट्यवधी यूजरला फायदा
गूगलच्या 15 जीबी मर्यादेत यूजरला जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि गूगल फोटोज आदी अॅप्सचा वापर करावा लागतो. गूगल ड्रायव्ह स्टोरेजसाठी यूजरला वेगळे स्टोरेज मिळत नाही. 15 जीबीच्या स्टोरेजमध्ये हे काम करावे लागते. त्याचा अर्थ तुम्ही जीमेलमध्ये जास्त स्टोरेज वापरल्यावर ड्राइव्हर कमी स्टोरेज मिळते.

रियायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे. त्यांनी जिओसाठी एक गजब रणनीती तयार केली. त्यामुळे जिओ युजर्सला फायदा झाला अन् गुगलची झोप उडाली. रिलायन्स जिओकडून कोट्यवधी प्रीपेड अन् पोस्टपेड यूजरला मोफत क्लाउड स्टोरेज दिले जात आहे. गूगल यूजर्सला अकाऊंट बनवल्यानंतर 15 जीबी डाटाची मर्यादा क्लाउडवर मोफत दिली जात आहे. परंतु मुकेश अंबानी यांनी जिओवर ही मर्यादा तीनपट जास्त दिली आहे.
गूगलच्या 15 जीबी मर्यादेत यूजरला जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि गूगल फोटोज आदी अॅप्सचा वापर करावा लागतो. गूगल ड्रायव्ह स्टोरेजसाठी यूजरला वेगळे स्टोरेज मिळत नाही. 15 जीबीच्या स्टोरेजमध्ये हे काम करावे लागते. त्याचा अर्थ तुम्ही जीमेलमध्ये जास्त स्टोरेज वापरल्यावर ड्राइव्हर कमी स्टोरेज मिळते. परंतु मुकेश अंबानी यांनी प्रीपेड यूजर्सला 299 रुपयांचा प्लॅनवर मोफत 50 जीबी क्लाउड स्टोरेजची ऑफर दिली आहे. प्रीपेड प्लॅनच नाही तर पोस्टपेड प्लॅनमध्येही क्लाउड स्टोरेजचा फायदा दिला जातो. 50 जीबी स्टोरेजची ऑफर मिळते.
गूगलसाठी असे लागतात पैसे
15 जीबीपेक्षा जास्त स्टोरेज झाल्यावर गूगल सर्व्हिसचा वापर करता येत नाही. त्यानंतर मेल येणे सुद्धा बंद होते. मग तुम्हाला जीमेल, फोटोज किंवा ड्राइव्ह रिकामे करावे लागते. अन्यथा गूगलचे तीन प्लॅनपैकी एक प्लॅन विकत घ्यावा लागतो. लाइट, बेसिक आणि स्टँडर्ड प्लॅनसाठी शुल्क आहे.




लाईटसाठी पहिले दोन महिने 15 रुपये लागतात. त्यानंतर 59 रुपये दर महिन्याला लागतात. लाइट प्लॅनमध्ये 30 जीबी स्टोरेज मिळते. बेसिक प्लॅनमध्ये 100 जीबी स्टोरेज दिले जाते. त्यासाठी पहिले दोन महिने 35 रुपये त्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून 130 रुपये लागतात. स्टँडर्ड प्लॅनमध्ये 200 जीबी स्टोरेज मिळते. त्यात पहिल्या दोन महिन्यांसाठी 50 रुपये त्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून 210 रुपये द्यावे लागतात.
मुकेश अंबानी यांच्या जिओने 5G नेटवर्कमध्येही देशात आघाडी घेतली आहे. रिलायन्स जिओची 5G डाउनलोडिंग स्पीड 158.63 Mbps आहे. एअरटेलची स्पीड 100.67 Mbps आहे. व्हिआय डाउनलोडिंग स्पीड 21.60 Mbps आहे. तर BSNL ची डाउनलोडिंग स्पीड 7.18 Mbps आहे.