Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JioPhone Next बाजारात, बुकिंगसाठी ग्राहकांकडे 3 पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने गुगलच्या सहकार्याने JioPhone Next तयार केला आहे आणि आता तो लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये टच स्क्रीनशिवाय स्पेशल ओएस देण्यात आला आहे.

JioPhone Next बाजारात, बुकिंगसाठी ग्राहकांकडे 3 पर्याय, जाणून घ्या सर्वकाही
JioPhone Next
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 4:03 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने गुगलच्या सहकार्याने JioPhone Next तयार केला आहे आणि आता तो लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये टच स्क्रीनशिवाय स्पेशल ओएस देण्यात आला आहे. JioPhone Next चे बुकिंग सुरु झाले आहे आणि त्याची विक्री 4 नोव्हेंबरपासून रिलायन्स स्टोअरवर होणार आहे. त्यामुळे आज आण्ही तुम्हाला हा फोन कसा बुक करता येईल, याबाबत माहिती देणार आहोत. (Jio phone next booking are opens, check three ways to buy cheapest smartphone)

फोन कसा बुक करायचा?

Reliance Jio चा JioPhone Next तीन प्रकारे बुक केला जाऊ शकतो. चला तर मग तिन्ही पद्धतींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पहिला मार्ग

jio.com/NEXT या लिंकवर जा आणि नंतर I am Interested पर्यायावर क्लिक करा. यानंतर वापरकर्त्यांकडून काही माहिती मागितली जाईल, ज्यामध्ये नाव आणि फोन नंबर इत्यादीचा समावेश असेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल, तिथून मोबाइल क्रमांकाची पडताळणी करावी लागेल. यानंतर पत्त्यासह इतर माहिती भरावी लागेल.

दुसरा मार्ग

दुसरा मार्ग म्हणजे व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग करणे. यासाठी तुमच्या फोनमध्ये 7018270182 हा नंबर सेव्ह करा आणि Hi लिहून पाठवा. यानंतर चॅटिंगवर आणखी काही माहिती विचारली जाईल, ती दिल्यानंतर यूजर्स त्यांचा Jio फोन बुक करू शकतात.

तिसरा मार्ग

तिसऱ्या पद्धतीनुसार, JioPhone Next स्मार्टफोनची बुकिंग JioMart डिजिटल रिटेल स्टोअरला भेट देऊन करता येईल.

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 4000 ते 5000 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला जाऊ शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.

JIOPHONE NEXT स्वस्तात खरेदीचे तीन पर्याय

  • पहिला हा ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 18 महिन्यांसाठी 350 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 300 रुपये द्यावे लागतील. प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 5 GB डेटा आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  • दुसरा प्लॅन आहे लार्ज प्लॅन, यामध्ये ग्राहकांना 18 महिने 500 रुपये किंवा 24 महिने 450 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  • तिसरा प्लॅन XL प्लॅन आहे, यामध्ये ग्राहकाला दररोज 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनसाठी ग्राहकाला 18 महिने 550 रुपये किंवा 24 महिने 500 रुपये भरावे लागतील.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Jio phone next booking are opens, check three ways to buy cheapest smartphone)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.