JioPhone Next ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, लाँचिंगपूर्वी कंपनीकडून मोठा धक्का

विश्लेषकांच्या मते, लाँच होण्यास विलंब झाल्यामुळे जिओफोन नेक्स्टची (JioPhone Next) किंमत अपेक्षेपेक्षा अधिक महाग होऊ शकते. मात्र आगामी डिव्हाइसच्या किंमतीबद्दल अद्याप टेलकोकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

JioPhone Next ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, लाँचिंगपूर्वी कंपनीकडून मोठा धक्का
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 6:47 PM

मुंबई : विश्लेषकांच्या मते, लाँच होण्यास विलंब झाल्यामुळे जिओफोन नेक्स्टची (JioPhone Next) किंमत अपेक्षेपेक्षा अधिक महाग होऊ शकते. आगामी डिव्हाइसच्या किंमतीबद्दल अद्याप टेलकोकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत Google बॅक्ड Jio Phone Next ची घोषणा करण्यात आली. हा स्मार्टफोन 10 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार होता, परंतु लॉन्च होण्याच्या एक दिवस आधी, इंडस्ट्री वाइड सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे लाँचिंग डेट दिवाळीच्या पुढे ढकलण्यात आली होती. (Jio Phone Next price in India could be higher than expected due to delay in launch)

जिओ आणि गुगलने म्हटले आहे की, त्यांनी जिओफोन नेक्स्ट संदर्भात बरीच प्रगती केली आहे. कंपनीने जिओ नेक्स्टची चाचणी सुरू केली आहे. सध्या हे फक्त मर्यादित वापरकर्त्यांसाठी आहे. जिओने आधी सांगितले होते की, हा देशातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल आणि जिओफोन नेक्स्ट 5000 रुपयांपेक्षा स्वस्त असेल अशी अपेक्षा होती. तथापि, एका अहवालानुसार, जिओफोन नेक्स्ट लॉन्च होण्यास विलंब झाल्यामुळे हा फोन महाग होण्याची शक्यता आहे.

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 3,499 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.

स्मार्टफोन फास्ट, उच्च दर्जाच्या कॅमेरऱ्यासह सज्ज आहे, ज्याद्वारे रात्री आणि कमी प्रकाशात क्लियर फोटो काढता येतील. फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी असलेल्या स्नॅपसोबत गुगलनेही भागीदारी केली आहे, जेणेकरुन स्नॅपचॅट लेन्स थेट फोन कॅमेराला देता येईल. Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) दिवाळीत लाँच होण्याची शक्यता आहे. जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.

जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

इतर बातम्या

iPad मिनी, वॉच सिरीज 7 सह iPhone 13 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

फूड डिलिव्हरी अॅपचा रेस्टॉरंटमध्ये समावेश होणार! जाणून घ्या जीएसटीचे नियम काय असतील?

(Jio Phone Next price in India could be higher than expected due to delay in launch)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.