आता Amazon Prime Video २ वर्षांसाठी फ्री, फक्त 749 रुपये भरा आणि मिळवा ‘हे’ जबरदस्त फायदे
Jio Plan: खूप कमी लोकांना माहिती असेल की Reliance Jio कडे एक असा प्लॅन आहे ज्याद्वारे Amazon Prime चा फायदा १ वर्षांसाठी नाही तर २ वर्षांसाठी मोफत दिला जातो. हा प्लॅन अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ Amazon Prime चाच फायदा नाही तर डेटा, SMS आणि कॉलिंगचाही फायदा मिळतो.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांसाठी अनेक नवीन प्लॅन लाँच करत असतात. त्याचबरोबर या कंपनीचे असे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत जे उत्तम फायदे देतात. जे की कमी लोकांना माहित आहेत. तुम्हाला देखील अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना 1 किंवा 2 महिन्यांसाठी नाही तर संपूर्ण 2 वर्षांसाठी Amazon Prime Video चा फायदा देत आहे आणि ते देखील अगदी मोफत.
तुम्हाला देखील या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर या जिओ प्लॅनची किंमत फक्त 749 रुपये आहे. तसेच या प्लॅनमध्ये केवळ ओटीटी बेनिफिट्सच मिळत नाहीत तर डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारखे फीचर्स देखील आहेत. जिओच्या या रिचार्ज प्लॅनला टक्कर देण्यासाठी, एअरटेलकडे 699 रुपयांचा प्लॅन देखील आहे.
jio 749plan
749 रुपयांच्या या जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 100 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा दिला जाईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. एवढेच नाही तर हा एक फॅमिली प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी 3 वेगवेगळे सिम घेऊ शकता आणि प्रत्येक सिमवर कंपनीकडून 5 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाईल.
प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये केवळ Amazon Prime Videoच नाही तर Netflix Basicचा देखील मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. रिलायन्स जिओच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन दोन वर्षांसाठी वैध असेल.
Airtel 699 plan
699 रुपयांच्या एअरटेल पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 105 जीबी हाय स्पीड डेटा, मोफत कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनसह तुम्ही 2 अतिरिक्त सिम देखील घेऊ शकता, तसेच प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन ६ महिन्यांसाठी Amazon Prime मोबाईल सबस्क्रिप्शन देखील देत आहेत.
फक्त Amazon वरच नाही तर, या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी Airtel Extreme Play Premium आणि Disney Plus Hotstar Mobile सबस्क्रिप्शन देखील मिळेल. मोफत हॅलो ट्यून व्यतिरिक्त, कंपनी पोस्टपेड वापरकर्त्यांना व्हीआयपी सेवा देखील देईल.
रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीच्या या दोन्ही प्लॅनसह, तुम्हाला रिचार्ज करताना जीएसटी देखील भरावा लागेल. जीएसटीनंतर किंमत थोडी वाढू शकते पण ज्या किमतीत रिलायन्स जिओ तुम्हाला दोन वर्षांसाठी अमेझॉन प्राइमचा फायदा देत आहे, त्या किमतीत इतर कोणतीही कंपनी तुम्हाला हा फायदा देत नाही.