जिओचा बजेटवाला ‘हा’ प्लॅन घ्या; रोज 2GB डेटासह मिळवा 20GB डेटा फ्री

जिओच्या या प्लॅनमध्ये भरपूर डेली डेटा ॲक्सेस मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत ८९९ रुपये आहे. कंपनीने ८९९ रुपयांच्या प्लॅनसोबत अनेक ऑफर्स आणल्या आहेत.

जिओचा बजेटवाला 'हा' प्लॅन घ्या; रोज 2GB डेटासह मिळवा 20GB डेटा फ्री
JIOImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:25 PM

आपल्या देशात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून अधिक ग्राहक त्यांच्याकडे वळतील. अलीकडेच प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओने त्यांचे अनेक प्लॅन महाग केले आहेत. या दरवाढीमुळे जिओ ग्राहक आता स्वस्तात अधिक बेनिफिट्स असलेले प्लॅन शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका प्लॅनची माहिती देणार आहोत, जे ग्राहकांना डेली डेटासोबत एक्स्ट्रा डेटा ची सुविधा देत आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर.

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर डेली डेटा ॲक्सेस मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत ८९९ रुपये आहे. कंपनीने त्यांच्या ८९९ रुपयांच्या प्लॅनसोबत धमाकेदार ऑफर आणली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटासोबत २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत.

जाणून घ्या किती आहे प्लॅनची वैधता

जिओच्या ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. मात्र या ऑफरअंतर्गत तुम्हाला डेली डेटासोबत २० जीबी अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. त्यानुसार ९० दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

डेटा संपल्यानंतरही इंटरनेट काम करेल

या प्लॅन आणि ऑफर अंतर्गत तुम्हाला डेटाची कमतरता भासणार नाही. कारण दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन @64 केबीपीएस पर्यंत सुरु राहतो. त्यामुळे तुमचा डेटा संपल्यानंतर सुद्धा इंटरनेट काम करेल. जिओच्या या प्लॅनमध्ये डेटाव्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज १०० फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला असा प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.