JioPhone Next मध्ये मिळणार कमी किंमतीत खास फीचर्स, जाणून घ्या कधी होणार लाँचिंग

JioPhone Next बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार असे कळतेय की, हा फोन दिवाळीच्या आसपास लाँच होऊ शकतो. तसेच यामध्ये युजर्सना अनेक खास फीचर्स मिळतील.

JioPhone Next मध्ये मिळणार कमी किंमतीत खास फीचर्स, जाणून घ्या कधी होणार लाँचिंग
आता JioPhone बद्दल सुंदर पिचाईंचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 5:36 PM

मुंबई : JioPhone Next बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार असे कळतेय की, हा फोन दिवाळीच्या आसपास लाँच होऊ शकतो. तसेच यामध्ये युजर्सना अनेक खास फीचर्स मिळतील. दिवाळीच्या सुमारास लॉन्च होणारा जिओफोन नेक्स्ट गुगल प्ले कन्सोलवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. ही सूची आगामी स्मार्टफोनच्या मुख्य वैशिष्ट्यांचे संकेत देते. (JioPhone Next will get special features at low price, when when the launch will take place)

जिओफोन नेक्स्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा फोन त्या लोकांसाठी तयार केला जात आहे, जे जास्त किंमतीमुळे टचस्क्रीन स्मार्टफोन खरेदी करण्यास तयार नाहीत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचं लाईट व्हर्जन वापरलं जाईल, जे अँड्रॉइड गो असू शकते. अँड्रॉइड गो प्रोग्राम विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे एंट्री लेव्हल आणि लो कॉन्फिगरेशन स्मार्टफोन खरेदी करतात.

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 4000 ते 5000 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला जाऊ शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.

स्मार्टफोन फास्ट, उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यासह सज्ज आहे, ज्याद्वारे रात्री आणि कमी प्रकाशात क्लियर फोटो काढता येतील. फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी असलेल्या स्नॅपसोबत गुगलनेही भागीदारी केली आहे, जेणेकरुन स्नॅपचॅट लेन्स थेट फोन कॅमेराला देता येईल.

Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन दिवाळीत लाँचिंगसाठी सेट आहे, जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. परंतु, जिओफोन नेक्स्टच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, कंपनी लोकांना विविध पर्याय देऊ इच्छिते जे विस्तृत सेल्स स्ट्रक्चरप्रमाणे आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ फोन नेक्स्ट, जो 500 रुपयांत खरेदी करता येईल.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(JioPhone Next will get special features at low price, when when the launch will take place)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.