Amazon ची ऑफर, फक्त 4 तास काम, दरमहिना कमवाल 60,000 रुपये

तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दर महिना 55,000 ते 60,000 रूपये कमवू शकता, चकित झालात का? चला कसे ते जाणून घेऊया.

Amazon ची ऑफर, फक्त 4 तास काम, दरमहिना कमवाल 60,000 रुपये
Equity Mutual Funds
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 1:50 PM

मुंबई : ‘अ‍ॅमेझॉन’ इंडिया (Amazon India) ही ई-कॉमर्स वेबसाईट लोकांना भरघोस पैसे कमवण्याची संधी देत आहे. जर तुम्हीही एका अशा नोकरीच्या शोधात आहे, जिकडे वेळेचे कोणतेही बंधन नसले तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दर महिना 55,000 ते 60,000 रूपये कमवू शकता, चकित झालात का? चला कसे ते जाणून घेऊया.

सध्या अ‍ॅमेझॉन ही कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. त्यासाठी अ‍ॅमेझॉनला त्यांचे उत्पादन वेळच्या वेळी डिलिव्हर करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या कंपनीजवळजवळ प्रत्येक शहरात डिलिव्हरी बॉय शोधत आहे. यात ग्राहकांचे पॅकेज गोदामातून उचलून त्यांच्या घरी पोचवावे लागते. जर तुम्हीही हे काम करू इच्छित असाल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या Amazon गोदामाशी संपर्क साधू शकता.

10 किंवा 15 किलोमीटरच्या परिसरात पॅकेजची डिलिव्हरी

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एका डिलिव्हरी बॉयला दर दिवशी साधारण 100 ते 150 पॅकेज वितरित करावे लागतात. हे सर्व वेअरहाऊसपासून 10 किंवा 15 किलोमीटरच्या परिसरात येतात. त्यामुळे तुम्ही हे काम 4 ते 5 तासांमध्ये सहजतेने पूर्ण करु शकता. त्यानंतर उर्वरित आपल्या कामाच्या तुमच्या कामाच्या पद्धतीवर अवलंबून असते. खास गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रोडक्टची डिलिव्हरी तुम्हाला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत करता येते. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या वेळेत हे काम करु शकता.

अर्ज कसा कराल?

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर https://logics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करा. डिलिव्हरी बॉय होण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच शाळा किंवा महाविद्यालय उत्तीर्ण केले असल्यास आपल्याकडे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असणे आवश्यक आहे. दुचाकी किंवा स्कूटर विमा RC वैध असावा. तसेच अर्जदाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावे लागते.

दर महिना कमवू शकता 60,000 रुपये 

अॅमेझॉनमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक मुलाला दर महिना नियमित पगार दिला जातो. Amazon मध्ये डिलिव्हरी बॉयला दरमहिना 12000 ते 15000 रुपयांपर्यंत निश्चित पगार मिळतो. पण यात पेट्रोलची किंमत मिळत नाही. पण जर तुम्ही उत्पादनाच्या डिलिव्हरीनुसार पगार घेत असाल तर तुम्हाला एका पॅकेजसाठी 10 ते 15 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मते, जर कोणी एका महिन्यासाठी काम करत असेल आणि त्याने दररोज 150 पॅकेजेस वितरित केले तर त्याला सहजरित्या महिन्या 55,000 ते 60,000 रुपये मिळतात.

(Job opportunity Earn Rs 60,000 every month by working only four hours with Amazon)

संबंधित बातम्या : 

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा ‘इतकी’ गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!

20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं

Petrol Diesel Price: पुढच्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.