‘मी 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, पण मला उत्तर हवंय’, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने (Juhi Chawla) सोमवारी देशात 5 जी (5G) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. नागरिक, प्राणी, वनस्पती आणि इतर जीवांवरील किरणोत्सर्गाच्या परिणामांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करुन तिने न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

‘मी 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, पण मला उत्तर हवंय’, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण
जुही चावला
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:03 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने (Juhi Chawla) सोमवारी देशात 5 जी (5G) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. नागरिक, प्राणी, वनस्पती आणि इतर जीवांवरील किरणोत्सर्गाच्या परिणामांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करुन तिने न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. जुहीने ही याचिका नोंदवल्यानंतर असे म्हटले जात होते की, ती ‘5 जी’ विरूद्ध आहे आणि त्यावर बंदी आणावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, आत अभिनेत्रीने हे स्पष्ट केले आहे की, ती 5 जी तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही (Juhi Chawla clarifies about her case against 5G technology).

आपला अजेंडा 5 जीवर बंदी घालण्याचा नसल्याचे जुहीने स्पष्ट केले आहे. ती म्हणाली की, लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला हे सर्वांना स्पष्ट करून सांगायचे आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. तथापि, आम्ही केवळ सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील केले की, 5 जी तंत्रज्ञान सर्व मानवजातीसाठी, पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध लोक, प्राणी सुरक्षित आहे का?, याचे उत्तर द्या.

याचिका सुनावणी दरम्यान वाजू लागली गाणी!

या याचिकेवर आजही सुनावणी सुरू झाली आहे. यापूर्वी ही सुनावणी 2 जून रोजी झाली होती. परंतु, त्या दरम्यान एका व्यक्तीने मध्येच अभिनेत्रीच्या चित्रपटातील गाणी गाणे सुरू केले होते. सुनावणीदरम्यान, जुही सामील होताच एका व्यक्तीने तिच्या ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटातील ‘घुंघट की आड़ में दिलबर का’ हे गाणे गाण्यास सुरुवात केली होती.

जूही चावलाचा 5 जी तंत्रज्ञानाला विरोध का?

जूही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली आहे की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं (Juhi Chawla clarifies about her case against 5G technology).

Jio, Airtel सह बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

दरम्यान, देशात 5G चाचणी सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स, एअरटेल आणि एमटीएनएलसह निवडक दिग्गज कंपन्यांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने यासाठी दूरसंचार ऑपरेटर्सना स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

दूरसंचार मंत्रालयाने 4 मे रोजी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती. विभागाने त्यांना चिनी कंपन्यांच्या तंत्राचा वापर न करता 5 जी चाचणी घेण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसह 5 जीच्या चाचणीस मान्यता दिली होती. याशिवाय रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन चाचणी घेणार आहे.

(Juhi Chawla clarifies about her case against 5G technology)

हेही वाचा :

Binge Watch | पुन्हा ताज्या होतील 90च्या दशकाच्या आठवणी, OTTवर पाहू शकता ‘या’ सर्वोत्कृष्ट मालिका!

‘शुभ्रा-बबड्या’चं नक्की चाललंय काय? आशुतोष-तेजश्रीच्या सोशल मीडिया संवादावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा!

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.