Fact Check : अब्जाधीश किरण मजूमदारांनी नारळाचं तेल नाकात टाकून कोरोनापासून स्वत:ला वाचवलं? मेसेजमागील सत्य काय?

सोशल मीडियावर किरण मजूमदार शॉ यांच्या नावानं एक मेसेज व्हायरल होत आहे. Kiran Mazumdar coconut oil

Fact Check : अब्जाधीश किरण मजूमदारांनी नारळाचं तेल नाकात टाकून कोरोनापासून स्वत:ला वाचवलं? मेसेजमागील सत्य काय?
किरण मजूमदार शॉ
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 1:38 PM

नवी दिल्ली: सोशल मीडियावर किरण मजूमदार शॉ यांच्या नावानं एक मेसेज व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये औषधे बनवणारी कंपनी बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ यांनी एका दिवसात चारवेळा नारळाचं तेलं नाकावर लाऊन कोरोना पासून स्वत:चं संरक्षण केल्याचा दावा केला जातोय. हा मेसेज व्हाटसअ‌ॅप पासून लिंक्डेन पर्यंत शेअर होत आहे. बायोकॉन कंपनींनं आता त्या मेसेजविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. (Kiran Mazumdar Biocon chief prevented herself from corona using coconut oil know fact behind this viral message)

बायोकॉन कंपनी काय म्हणाली?

बायोकॉन कंपनीनं सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. कंपनीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये #FakeForwardAlert: किरण किरण मजूमदार शॉ यांच्या नावानं खोटा मेसेज व्हॉटसअ‌ॅपवर शेअर केला जातोय. यामध्ये त्यांनी नारळाचं तेलं वापरुन कोरोनापासून सुटका करुन घेतल्याचं मह्टलं जातंय, हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीनं व्हायरल मेसेजमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये, असं म्हटलं आहे.

भारतातील लसीकरण अरेंज मॅरेज सारखं

“भारतातील कोरोना लसीकरण परिस्थिती (COVID vaccination) ही अरेंज मॅरेजसारखी (Arrange Marriage) झाली आहे. आधी तुम्ही तयार नसता, नंतर तुम्हाला मिळत नाही” अशी तुलना ‘बायोकॉन लिमिटेड’च्या सीईओ किरण मजूमदार-शॉ (Kiran Mazumdar-Shaw) यांनी केली आहे. शॉ यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सच्याही क्रिएटिव्हिटीला धुमारे फुटले पाहायला मिळाले.

कोण आहेत किरण मजूमदार-शॉ?

किरण मजूमदार शॉ या बंगळुरुतील बायोटेक कंपनी ‘बायोकॉन लिमिटेड’ (Biocon Limited) आणि ‘बायोकॉन बायोलॉजिक्स’च्या (Biocon Biologics) कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. बंगळुरुतील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. 68 वर्षीय किरण मजूमदार-शॉ या भारतीय अब्जाधीश उद्योजक असून त्यांनी फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही स्थान मिळवलं होतं.

संबंधित बातम्या:

“लसीकरण परिस्थिती अरेंज मॅरेजसारखी, आधी तुम्ही तयार नसता, अखेर कुठलीच मिळत नाही”

कोरोनाची चार नवी लक्षणे, ज्याबाबत मधुमेही रुग्णांना माहित असणे गरजेचे

 रिकव्हरीनंतर कोरोनाची ही लक्षणे दिसल्यास करु नका दुर्लक्ष

(Kiran Mazumdar Biocon chief prevented herself from corona using coconut oil know fact behind this viral message)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.