Jio Freedom Offer : रोज 2GB डेटासह 90 दिवसांची वैधता, नवीन प्लॅनबद्दल जाणून घ्या…
12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असेल. JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रुपये आहे. याविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या...
नवी दिल्ली : आजकाल रिचार्जच खर्च हा ठरलेला असतो. तो टाळून चालत नाही. कारण, हल्ली सगळी काही मोबाईलशिवाय (Mobile) अशक्य आहे. अनेक लोक खर्च वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. स्वस्त मोबाईल रिचार्जही पाहतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक ऑफर (Offer) सांगणार आहोत. जिओने (Jio) काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त 2,999 रुपयांचा प्लॅन आणला होता आणि आता कंपनीनं आणखी एक नवीन प्री-पेड प्लॅन सादर केला आहे. Jio ने ‘₹750 Unlimited Plan’ प्लान लाँच केला आहे. 750 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 749 रुपयांचे फायदे मिळत आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. जिओचा हा 750 रुपयांचा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन येतो. जिओच्या या प्लॅनसह सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध होईल.
हर घर जिओफायबर ऑफर
जिओने ‘हर घर तिरंगा, हर घर जिओफायबर’ देखील लाँच केली आहे जी नवीन ग्राहकांसाठी आहे. ही ऑफर Jio Fiber पोस्टपेडसाठी आहे. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत या योजनेचा लाभ घेता येईल. अतिरिक्त लाभ म्हणून या प्लॅनसह 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असेल.
हायलाईट्स
- जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त 2,999 रुपयांचा प्लॅन आणला
- कंपनीनं आणखी एक नवीन प्री-पेड प्लॅन सादर केला
- 12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध
- JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रु.
- Jio ने ‘₹750 Unlimited Plan’ प्लान लाँच केला
- 750 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 749 रुपयांचे फायदे मिळत आहे
- जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार
- जिओच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध असेल
- जिओचा हा 750 रुपयांचा प्लॅन अमर्यादित कॉलिंग
- 100 एसएमएस प्रतिदिन
- जिओच्या या प्लॅनसह सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध
15 दिवसांची अतिरिक्त वैधता
12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असणार आहे. JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रुपये आहे. ही ऑफर 6/12 महिन्यांसाठी प्लॅनवर लागू असेल. यासोबतच काही कॅश व्हाउचर देखील उपलब्ध असतील जे MyJio अॅपमध्ये पाहता येतील.
हे करा….
रिचार्ज मारण्यापूर्वी आधी कंपनीचे रिचार्ज पाहून घ्या. त्यामुळे तुम्हाला स्वस्त प्लॅन मिळू शकेल. तुम्ही अपडेटही रहाल आणि पैसैही वाचतील.