Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. यात 4400mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. वायरलेस चार्जिंग देखील आहे. फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम, 512 GB पर्यंत स्टोरेज असेल.

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या...
Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:01 AM

नवी दिल्ली : सॅमसंग (Samsung) ने Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 ची भारतीय किंमत (Price) जाहीर केली आहे . Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 साठी प्री-बुकिंग देखील सुरू झालंय. कंपनीने प्री-बुकिंगच्या आधी दोन्ही फोनची (Phone) किंमत जाहीर केली आहे. दोन्ही फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन सॅमसंगने 10 ऑगस्ट रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लाँच केले आहेत. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर Samsung Galaxy Z Flip 4 आणि Samsung Galaxy Z Fold 4 या दोन्ही फोनमध्ये देण्यात आला आहे. Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 च्या सर्व प्रकारांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल आम्ही तुम्हाला  सांगणार  आहोत.

किंमत किती?

8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 ची किंमत 89,999 रुपये आणि 256 जीबी स्टोरेजसह 8 जीबी रॅमची किंमत 94,999 रुपये आहे. दुसरीकडे Samsung Galaxy Z Fold 4 ची 12 GB RAM सह 256 GB स्टोरेजची किंमत 1,54,999 रुपये आणि 512 GB स्टोरेजसह 12 GB रॅमची किंमत 1,64,999 रुपये आहे. सॅमसंगचे हे दोन्ही फ्लॅगशिप बुक करणाऱ्या ग्राहकांना 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. याशिवाय प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 5,199 रुपयांची खास भेट मिळेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. Galaxy Z Flip 4 Bespoke Edition सह ग्राहकांना 2,000 रुपयांचे स्लिम कव्हर मोफत मिळेल. प्री-बुकिंग 17 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल.

लेन्स 50 मेगापिक्सेल

Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X Infinity Flex प्राथमिक डिस्प्ले आहे. दुसरा डिस्प्ले 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी ओ कव्हर डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1300 nits आहे. फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत. ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरी लेन्स 10 मेगापिक्सेल आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील उपलब्ध असेल.

हे सुद्धा वाचा

Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर

समोर दोन कॅमेरे आहेत, त्यापैकी एक 10 मेगापिक्सेलचा आणि दुसरा 4 मेगापिक्सेलचा आहे. फोनसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + चे संरक्षण आहे. कॅमेरासह 30x स्पेस झूम देखील उपलब्ध असेल. या सॅमसंग फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. यात 4400mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. सोबत वायरलेस चार्जिंग देखील आहे. फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.