Koo ची ट्विटरला जोरदार टक्कर, 2 कोटी डाऊनलोड्स पूर्ण, देसी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार

भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू'साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. 'कू' चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देतो. दरम्यान, 'कू'ने मागच्या वर्षभरात 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे.

Koo ची ट्विटरला जोरदार टक्कर, 2 कोटी डाऊनलोड्स पूर्ण, देसी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार
Koo app
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 5:41 PM

मुंबई : भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. ‘कू’ चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देतो. दरम्यान, ‘कू’ने मागच्या वर्षभरात 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. (Koo app crosses 2 crore downloads after launch, microblogging platform will available in 22 Indian Language)

कू हा प्लॅटफॉर्म देशात वेगाने वाढतोय, या वेगवान वाढीत अनेक घटना-घडामोडींचा वाटा आहे. त्यात महत्त्वाचा ठरला तो 2021 चा टी-20 वर्ल्ड कप. वर्ल्डकपदरम्यान क्रिकेट फॅन्सना ‘कू’ने #SabseBadaStadium कॅम्पेनच्या माध्यमातून एक खास अनुभव दिला. दर्जेदार तंत्रज्ञान आणि सक्षम भाषांतर फीचर्सच्या बळावर कू येत्या वर्षात 10 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठेल, असे कंपनीला वाटते.

बहुभाषिक विस्तार

2020 मध्ये पहिल्यांदा कानडी भाषेत सुरू झालेले ‘कू’ ॲप आता एकूण 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मराठी, हिंदी, कानडी, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, आसामी आणि इंग्रजी भाषेचा समावेश आहे. ‘कू’चा मंच अगदीच सर्वसमावेशक आहे. इथे युजर्सना डिजीटल पातळीवर भाषिक अडथळे ओलांडत अगदी मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे पोस्ट करतानाच आशयाला धक्का न लावता विविध भाषांमध्ये ती अनुवादित करून मिळण्याचीही सुविधा ‘कू’ देते. भविष्यात सगळ्या 22 अधिकृत भारतीय भाषांमध्ये सेवा देण्याच्या तयारीत ‘कू’ आहे.

एशिया पॅसिफिक स्तरावरचा सन्मान

‘कू’ने 2021 मध्ये एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान मिळवला. ‘अॅम्प्लिट्यूड’च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले. एपीएसी (APAC) युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा ‘कू’ हा एकमेव सोशल मीडिया ब्रॅन्ड ठरला. भारतीय ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळालेला आहे. ‘कू’सोबतचा दुसरा ब्रॅन्ड आहे कॉइनसीडीएक्स (CoinDCX).

डिजीटल क्षेत्रात भाषेच्या योग्य वापरासाठीचे प्रयत्न

म्हैसूरमधील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ (CIIL) आणि Bombinate Technologies Pvt Ltd यांनी एका संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज ही भारताच्या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कू (Koo)ची होल्डिंग कंपनी आहे. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासह भाषेच्या योग्य वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांनी हा सामंजस्य करार (MoU) केला. भारतीय भाषांच्या विकासामध्ये समन्वय साधण्यासाठी भारत सरकारने CIIL ची स्थापना केली आहे. आता CIIL ‘कू’ ॲप सोबत एकत्र काम करणार आहे. यातून भाषिक धोरणे मजबूत होतील आणि सोबतच युजर्सना ऑनलाइन सुरक्षा मिळणे सोपे होईल. यासह हा करार ऑनलाइन गैरकृत्ये, गुंडगिरी आणि धमक्यांपासून रक्षण करण्याच्या दृष्टीनेही उपयोगी ठरेल.

या उपक्रमाच्या माध्यमातून CIIL संस्था 22 भाषांमध्ये आक्षेपार्ह किंवा संवेदनशील मानले जाणारे शब्द, वाक्प्रचार, संक्षेप आणि संक्षिप्त शब्दांचा एक डेटा तयार करेल. ‘कू’ ॲप हा संग्रह तयार करण्यासाठी गरजेचा डेटा एकत्रित करेल आणि सोबतच असे इंटरफेस तयार करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्थाही दोन वर्ष पुरवेल. भारतीय भाषांचा ऑनलाइन समाजमाध्यमांवर आदर्श वापर केला जावा यासाठीची ही दीर्घकालीन मोहिम असणार आहे.

इतर बातम्या

OnePlus 10 Pro पुढच्या आठवड्यात बाजारात, लाँचिंगआधीच कॅमेरा डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स लीक

15 मिनिटांत चार्ज होणारा स्मार्टफोन या आठवड्यात भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

18000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एकापेक्षा एक गेमिंग स्मार्टफोन, पाहा टॉप 5 मोबाईल

(Koo app crosses 2 crore downloads after launch, microblogging platform will available in 22 Indian Language)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.