‘कॉपी पेस्ट’चे जनक लॅरी टेस्लर यांचे निधन
तंत्रज्ञान क्षेत्रातील कॉपी पेस्ट जनक म्हणून ओळखले जाणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर लॉरी टेस्लर यांचे आज (20 फेब्रुवारी) निधन झाले.
न्यूयॉर्क : कॉम्प्युटर (संगणक) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला (Larry Tesler Died) आहे. कॉम्प्युटरवर काम करताना स्पेसबार व्यतिरिक्त Ctrl+C आणि Ctrl+V ही बटण सर्वाधिक वापरली जातात. कोणतीही फाईल कॉपी करण्यासाठी Ctrl+C आणि ती ठराविक ठिकाणी पेस्ट करण्यासाठी Ctrl+V या बटणाचा वापर केला जातो. तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘कटकॉपीपेस्ट’चे जनक म्हणून ओळखले जाणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर लॉरी टेस्लर यांचे आज (20 फेब्रुवारी) निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.
लॉरी टेस्लर यांचा जन्म 1945 मध्ये अमेरिकाच्या न्यूयॉर्क शहरात झाला. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटरच्या इंटरफेस डिझाईनचं काम सुरु केले. यानंतर 1960 मध्ये टेस्लर यांनी कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम (Larry Tesler Died) केलं.
अमेरिकेच्या सिलिकॉन वॅलीमध्ये काम करताना त्यांनी कॉपी-पेस्ट या प्रक्रियेला सोपं बनवण्यासाठी Ctrl+X, Ctrl+C आणि Ctrl+V या बटणांचा शोध लावला.
टेस्लर यांनी संपूर्ण आयुष्यभर कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम केले. त्यांनी अनेक नामांकित टेक कंपन्यांमध्येही काम केलं आहे. झेरॉक्स अल्टो रिसर्च सेंटरमध्ये काम करत असताना अॅप्पलचे फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी टेस्लर यांना बोलवलं. टेस्लरने अॅप्पल या कंपनीत 17 वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी अॅमेझॉन आणि याहू या कंपन्यांसाठी काम (Larry Tesler Died) केलं.