तीन दमदार कॅमेरे अन्‌ 5000mAh बॅटरीसह Oppo A57 (2022) लाँच… जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

ओप्पोने आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तीन कॅमेरे आणि 5000mAh बॅटरीसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हँडसेट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. केवळ एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे.

तीन दमदार कॅमेरे अन्‌ 5000mAh बॅटरीसह Oppo A57 (2022) लाँच... जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
ओप्पो ए57Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 10:16 PM

Oppo A57  : चिनी स्मार्टफोन ब्रँड ओप्पोने (Oppo) आपला नवीन बजेट फोन ओप्पो ए 57 (2022) (Oppo A57 2022) लाँच केला आहे. कंपनीने  थायलंडमधील एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनचे लाँचिंग केली आहे. ओप्पोने या फोनचा 5G व्हेरिएंट चीनमध्ये लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर देण्यात आला आहे. ओप्पोचा हा नवीन स्मार्टफोन (Smartphone) 3जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. यात ड्युअल रियर कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. या नवीन बजेट स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती या लेखातून घेणार आहोत.

ओप्पो ए57 (2022) ची किंमत

ओप्पोने हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एका कॉन्फिगरेशनमध्ये 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजमध्ये उवलब्ध आहे, याची किंमत 5499 THB म्हणजे अंदाजे 12,500 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन शायनिंग ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. रंगात खरेदी करू शकता. कंपनी हा फोन भारतात लाँच करेल की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.

काय आहेत वैशिष्ट्ये

ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Color OS 12 वर काम करतो. Oppo A57 (2022) मध्ये 6.56-इंचाचा HD + LCD डिसप्ले असून तो 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनचा आहे. हे डिव्हाइस 3जीबी रॅमसह Octacore MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करते.

हे सुद्धा वाचा

फ्रंटमध्ये 8 एमपी सेल्फी कॅमेरा

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर, Oppo A57 (2022) मध्ये 13एमपी प्राइमरी लेंससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय 2एमपी डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 8एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 64एमपी इन-बिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लुटूथ, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. त्याचे वजन 187 ग्रॅम आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.