Lava : वायरलेस इअरफोन केवळ 11 रुपयांत! काय आहे Lava Probuds N11वर ऑफर? वाचा…

सध्या बाजारात बोट स्कलकॅन्डी, रेडमी, वन प्लस, रिअलमी, सॅमसंग अशा विविध कंपन्यांचे इअरफोन्स उपलब्ध आहेत. अलिकडे वायरलेस इअरफोन्सना अधिक मागणी आहे.

Lava : वायरलेस इअरफोन केवळ 11 रुपयांत! काय आहे Lava Probuds N11वर ऑफर? वाचा...
Lava Probuds N11Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:34 AM

देशांतर्गत हँडसेट निर्माता लाव्हा (Lava) कंपनीने ग्राहकांसाठी आपले नवीन वायरलेस इयरफोन Lava Probuds N11 लाँच केले आहेत. कंपनीचे हे नवीन बजेट वायरलेस इयरफोन (Wireless earphones) आहेत. लॉन्ग लाइफ बॅटरीसह उत्कृष्ट कॉलिंग अनुभव देतात, असा कंपनीतर्फे दावा करण्यात आला आहे. भारतातील Lava Probuds N11च्या किंमतीवरून या इयरफोन्समध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल माहिती घेता येईल. कंपनीने या लावा वायरलेस इयरफोन्सची किंमत 999 रुपये निश्चित केली आहे, परंतु प्रास्ताविक ऑफरबद्दल (Offer) बोलायचे झाले, तर हे नवीन वायरलेस इयरफोन्स Amazonवरून 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता फक्त 11 रुपयांमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे इअरफोन 999 रुपयांना मिळतील, परंतु 17 सप्टेंबरपासून हे इअरफोन्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1499 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Lava Probuds N11ची वैशिष्ट्ये

हे वायरलेस इयरफोन 12mm ड्रायव्हरसह लॉन्च करण्यात आले आहेत. हे उपकरण ड्युअल हॉलस्विच फीचरसह लॉन्च करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना म्युझिक प्ले/पॉज यासारख्या सुविधा मिळणार आहेत. याशिवाय हे इअरफोन व्हॉइस असिस्टंट फीचरलादेखील सपोर्ट करतात.

वॉटर रेझिस्टन्स रेटिंग

हे इयरफोन टर्बो लेटन्सी आणि प्रो गेम मोड यासारख्या वैशिष्ट्यांसह येतात, जे 60msपर्यंत कमी लेटन्सी ऑफर करू शकतात. कंपनीचा दावा आहे, की हे इयरफोन IPX6 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह आणले गेले आहेत. घराबाहेर कॉलिंगचा उत्तम अनुभव मिळावा, यासाठी आजूबाजूचा आवाज कमी करण्याचे वैशिष्ट्यदेखील त्यात देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

वायरलेस इअरफोन्सना अधिक मागणी

सध्या बाजारात बोट स्कलकॅन्डी, रेडमी, वन प्लस, रिअलमी, सॅमसंग अशा विविध कंपन्यांचे इअरफोन्स उपलब्ध आहेत. अलिकडे वायरलेस इअरफोन्सना अधिक मागणी आहे. इअरबड्समध्ये अनेकांना बाहेर असताना कॉलिंगवेळी समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी वायरलेस इअरफोन अधिक योग्य ठरतो. त्यातही जर नॉइस कॅन्सलेशन हे फीचर असेल तर कॉलिंग अधिक चांगल्या दर्जाचे होते. त्यामुळे अशा इअरफोन्सना अधिक मागणी असते. या पार्श्वभूमीवर Lava Probuds N11ला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.