16GB रॅम-50MP कॅमेरा, मिळवा हा फोन 10 हजार रुपयांच्या आत

Lava Yuva 3 Pro | 10 हजार रुपयांपर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी Lava Yuva 3 Pro स्मार्टफोन बाजारात आला आहे. या किंमतीत हा फोन तुम्हाला 8 जीबी ऐवजी 16 जीबीपर्यंत रॅम देतो. या बजेटमध्ये फोनमध्ये इतर पण अनेक जोरदार फीचर आहेत. ग्राहकांना यामध्ये 50MP कॅमेरा मिळतो. इतर ही अनेक फीचर यामध्ये आहेत.

16GB रॅम-50MP कॅमेरा, मिळवा हा फोन 10 हजार रुपयांच्या आत
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 11:40 AM

नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : हँटसेट निर्माता कंपनी Lava ने भारतीय बाजारात दमदार बजेट स्मार्टफोन उतरवला आहे. ग्राहकांसाठी हा एक नवीन स्मार्टफोन दाखल झाला आहे. कंपनीने Lava Yuva 3 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन रंगात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन AG ग्लास बॅक पॅनलसह आणला आहे. त्यामुळे तो लक्षवेधी ठरला आहे. 10 हजार रुपयांपर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोन खास आहे. यामध्ये तुम्हाला 8 जीबी ऐवजी 16 जीबीपर्यंत रॅम मिळते. तर ग्राहकांना यामध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.

असे आहे फीचर

या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर, दमदार बॅटरी आणि फास्ट चार्ज सपोर्टसारख्या अनेक सुविधा मिळतात. या Lava Yuva 3 Pro फोनमध्ये ग्राहकांना इतर पण अनेक सुविधा मिळतात. हा तरुणांनासाठी एकदम बजेट फोन आहे. याचा 6.5 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले या फोनला खास लूक देतो.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत

या स्वस्त बजेट स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. हा डिव्हाईस ग्राहकांसाठी डेसर्ट गोल्ड, फॉरेस्ट Viridian आणि मीडो पर्पल रंगात उपलब्ध आहे. हा हँडसेट लावा रिटेल नेटवर्क आणि लावाच्या अधिकृत साईटवर खरेदी करता येतो.

Lava Yuva 3 Pro Specifications

90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह हा मोबाईल 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी लावा कंपनीच्या या लेटेस्ट फोनमध्ये युनिसॉक टी616 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. तुम्ही व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने याचे रॅम 16 जीबीपर्यंत सहज वाढवू शकता. या मोबाईलच्या मागील भागात 50 मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस 8 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल स्टोअरेजसाठी हँडसेटमध्ये 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढविण्यात येते.

कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक देण्यात आले आहे. या फोनच्या सुरक्षेसाठी पॉवर बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर इंटिग्रेट करण्यात आले आहे. यामध्ये 5000 एमएएचची बॅटरीची क्षमता आहे. 18 वॅट फास्ट चार्ज पोर्ट त्यासाठी उपलब्ध आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.