जगातील पहिला लॅपटॉप जो सुर्यप्रकाशावर होणार चार्ज, स्टाइल आणि डिजाईनही सर्वात भारी
Lenovo कंपनीने एक लॅपटॉप लाँच केला आहे जो तुम्ही सूर्यप्रकाशाने चार्ज करू शकता. हो, हा जगातील पहिला लॅपटॉप आहे जो सौरऊर्जेने चार्ज होतो. जाणून घ्या त्यात आणखी कोणत्या खास गोष्टी आहेत.

लॅपटॉपचा वापर आता प्रत्येकजण करू लागलेला आहे. आपण पाहतोच की कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसपर्यंत प्रत्येकांना लॅपटॉपचा वापर करावा लागतो. त्यात लॅपटॉप आपण सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. पण जेव्हा लॅपटॉप चार्ज करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला विजेची गरज पडते. अशातच तुम्हाला लॅपटॉप चार्ज करताना विजेच्या वापराची काळजी वाटत असेल, तर आता तुम्ही समजून घ्या की तुमचा हा ताण लवकरच दूर होणार आहे. कारण लेनोवो (Lenovo) कंपनीने असा लॅपटॉप लाँच केला आहे जो केवळ विजेनेच नाही तर सौरऊर्जेनेही चार्ज होतो. हो, हा लेनोवो लॅपटॉप सूर्यप्रकाशाने चार्ज होतो. लेनोवो कंपनीने बार्सिलोना येथे झालेल्या MWC 2025 या इव्हेंटमध्ये असाच एक लॅपटॉप लाँच केला आहे.
मात्र हा लॅपटॉप भारतात कधी लाँच होईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. या लॅपटॉपचे नाव Lenovo Yoga Solar PC Concept असे आहे. लेनोवोच्या नवीनतम संकल्पना लॅपटॉपमध्ये स्क्रीनच्या मागे एक फोटोव्होल्टेइक सोलर पॅनेल आहे, जो लॅपटॉपच्या बॅटरीसाठी प्रकाशाचे चार्जमध्ये रूपांतर करतो.
लॅपटॉपची स्टाईल आणि डिझाईन
लेनोवो कंपनीचा हा लॅपटॉप सामान्य लॅपटॉपसारखा दिसेल. तुम्हाला त्यात काही विशेष दिसणार नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सौरउर्जेवर चालणाऱ्या या लॅपटॉपची बॉडी ही खूप स्लीक आणि स्लिम आहे. म्हणजे तुम्ही ते कधीही, कुठेही घेऊन जाऊ शकता. लॅपटॉपच्या डिस्प्लेच्या मागे एक सोलर पॅनेल ग्रिड आहे, जो लॅपटॉपच्या बिल्ट-इन बॅटरीला पॉवर आणि चार्ज करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश आणि इनडोर लाइटिंग या दोन्हीमधून मिळणारी ऊर्जा वापरता येणार आहे.
लेनोवो कंपनीचे म्हणणे आहे की हा लॅपटॉप 9 तासांच्या सौरऊर्जेत 0-86 % पर्यंत चार्ज होऊ शकतो. जर तुम्ही हा लॅपटॉप 20 मिनिटे उन्हात ठेवले तर तुम्ही बराच वेळ लॅपटापवर सहज काम करू शकता. लेनोवोने यासोबत सौरऊर्जेवर चालणारा कीबोर्ड आणि माउस देखील लाँच केला आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी तुम्ही हा सौरऊर्जेवर चार्ज होणारा लॅपटॉप कसा चार्ज कराल… तर कंपनीने या गोष्टी लक्षात घेऊन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा लॅपटॉप तुम्ही तुमच्या घराची वीज वापरू चार्ज करू शकाल.