Electric Scooter: मोबाईलने लॉक करा तुमची इलेक्ट्रिक स्कूटर… ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांसाठी अपडेट फिचर

ओला इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फिचर घेउन आले आहे. ज्याअंतर्गत तुम्ही तुमची इलेक्ट्रिक स्कूटर मोबाईलमधील एका ॲपव्दारे लॉक करु शकणार आहात. सुरुवातीच्या वाहनांना ही सुविधा देण्यात आलेली नव्हती त्यामुळे कंपनीने हे फिचर अपडेट करुन उपलब्ध केले आहे.

Electric Scooter:  मोबाईलने लॉक करा तुमची इलेक्ट्रिक स्कूटर... ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांसाठी अपडेट फिचर
इलेक्ट्रिक स्कूटर्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 2:31 PM

मुंंबई : ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या (electric scooter) सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी एक फिचर उपलब्ध होणार आहे. ओला इलेक्ट्रिक्सने आपल्या ग्राहकांसाठी एक मोबाईल ॲपची (mobile app) निर्मिती केली आहे. ज्याव्दारे तुम्ही मोबाईलचा वापर करुन तुमची इलेक्ट्रिक स्कूटर लॉक करु शकणार आहात. ओला इलेक्ट्रिक लवकरच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रो वर आपले पहिजे ओटीए म्हणजेच ओव्हर द एअर अपडेट करणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने सांगितले की, ते आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हे मिसिंग फिचर लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार आहे.

  1. ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओला ॲपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे, की ओलाचे स्कूटर ॲप लवकरच ॲक्टिव्ह होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेफ्टी फिचरमध्ये अजून भर पडणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलव्दारे तुमची इलेक्ट्रिक स्कूटर लॉक करु शकणार आहात. दरम्यान, जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करत नसाल तर स्कूटरला लॉक करण्यासाठी ॲप लॉक सुविधेला कसे अक्टिव्हेट केले पाहिजे, याबाबत ॲप लॉकच्या आधी ओला इलेक्ट्रिकने खुलासा केला होता. त्यानुसार, त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रोमध्ये हे सॉफ्टवेअर अपडेट मिसिंग होते.
  2. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाल्यानंतर एस1 आणि एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हा पहिला ओटीए अपडेट आहे. कंपनी स्कूटरमध्ये आणखी काही स्पेसिफिकेशन्स ॲड करणार असून, त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, नेव्हीगेशन आणि क्रूज कंट्रोल सारख्या फिचर्सचा समावेश आहे. ओला इलेक्ट्रिकने नवीन अपडेट होत असलेल्या आपल्या सर्व सुविधांची एक यादी तयार केली आहे. दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना हिल होल्ड कंट्रोल आणि हाईपर मोड सारख्या काही सुविधांसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. वरुण दुबे यांनी नुकतेच, सांगितले होते की, यातील काही अपडेट्‌स या वर्षी जूनच्या अगोदर होण्याची शक्यता आहे.

संंबधित बातम्या :

DSLR कॅमेरा: उन्हाळी सुटीत ‘फोटोग्राफी’चा प्लॅन करताय? त्यासाठीचे उत्तम पर्याय स्वस्तातले DSLR कॅमेरे..!

AC on your bed | बजेटमध्ये बसेल असा बेड एअर कंडिशनर, खिडकीत नव्हे पलंगावर बसवा नि थंड व्हा!

गुगल प्ले स्टोअरवरुन कॉल रेकाँर्डिग ॲप होणार डिलिट… चिंता नको असा काढा मार्ग

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.