WhatsApp | मोठी अपडेट, एकाच फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सअप
WhatsApp | व्हॉट्सअप युझर्ससाठी खुशखबर आहे. आता ते एकाच मोबाईलमध्ये दोन व्हॉट्सअप वापरु शकतात. दोन व्हॉट्सअप खाती ते लॉग इन करु शकता. त्यामुळे नवीन युझर्सला दोन व्हॉट्सअपसाठी दोन मोबाईल खरेदीची आवश्यकता नाही. ते एकाच वेळी त्यांच्या मोबाईलमध्ये दोन व्हॉट्सअप चालवू शकतील.

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : Whatsapp वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. लवकरच ते एकावेळी दोन व्हॉट्सअप खाती लॉग इन करु शकतील. व्हॉट्सअपनेच गुरुवारी ही महत्वाची अपडेट दिली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने या नवीन घडामोडींची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याविषयीची पोस्ट लिहिली. व्हॉट्सअपला दोन खात्यात स्वीच करता येईल, असे त्यांनी जाहीर केले. लवकरच व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला दोन व्हॉट्सअप खाती हाताळता येतील. त्यासाठी काही बदल करावे लागतील. सेटिंगमध्ये लवकरच याविषयीचे अपडेट होतील. त्यानंतर युझर्सला त्याचा वापर करता येईल.
युझर्सचा होईल फायदा
‘आता तुम्हाला प्रत्येकवेळी लॉग आऊट करण्याची, दोन मोबाईल खरेदी करण्याची वा चुकीच्या ठिकाणी मॅसेज जाण्याची भीती राहणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणचा मॅसेज एकाच ठिकाणी वाचण्याची सुविधा मिळणार आहे.’ अशी माहिती मेटाने दिली आहे. दुसरे खाते तयार करण्यासाठी दुसरा मोबाईल क्रमांक, दोन सिम कार्डचा मोबाईल, मल्टी-सिम वा ईसिमची गरज असेल.
कसे जोडणार दुसरे खाते
- एकाचवेळी दोन व्हॉट्सअप वापरण्यासाठी बदल करावा लागले
- व्हॉट्सअप सेटिंग्जमध्ये हा बदल करता येईल
- व्हॉट्सअप सेटिंग्ज उघडून एड अकाऊंट हा पर्याय निवडा
- याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरुन खाते जोडता येईल
- खाते जोडण्यासाठी अधिकृत एपचाच वापर करा
- कोणत्याही दुसऱ्या सेटिंग्जचा वा शॉर्टकटचा वापर करणे धोक्याचे असेल
आता एसएमएस प्रमाणिकरणाची गरज नाही व्हॉट्सअपने या आठवड्याच्या सुरुवातीला वापरकर्त्यांना आणखी एक सुविधा दिली आहे. त्यानुसार, अँड्रॉईड वापरकर्त्यांना एसएमएस प्रमाणिकरणाची गरज नाही. Android युझर्स Passkey सह सहज आणि सुरक्षितपणे लॉग इन करू शकतात. युझर्स त्यांचा चेहरा, बोटांचा ठसा वा पिन आधारे त्यांचे व्हॉट्सअप खाते अनलॉक करु शकतात, असे मेटाने सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केले आहे.