लॅपटॉप सतत हँग होतो? या 5 ट्रिक्स वापरून बघा, स्पीड झपाट्याने वाढेल!
लॅपटॉप हळू चालतोय पण नवीन घ्यायची गरज नाही फक्त थोडं टेक केअर केल्यास आणि या काही ट्रिक्स फॉलो केल्यास तुमचाच जुना लॅपटॉप पुन्हा एकदा 'फास्ट अँड स्मार्ट' बनू शकतो!

ऑफिसमधलं काम असो, कॉलेजचे प्रोजेक्ट्स असो किंवा अगदी मनोरंजन लॅपटॉप शिवाय जगणं आज जवळजवळ अशक्यच झालं आहे. मात्र, जेव्हा लॅपटॉपची स्पीड अचानक कमी होते, तेव्हा काम करणं म्हणजे एक मोठाच त्रास वाटतो. पण काळजी करू नका काही साध्या आणि सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमचा जुनाट लॅपटॉप पुन्हा एकदा झपाट्याने काम करू लागेल.
1. HDDला बाय-बाय, SSDला हॅलो करा : जुना लॅपटॉप हळू चालण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्यातील हार्ड डिस्क (HDD). जर तुमच्याकडे अजूनही HDD असेल, तर ताबडतोब SSD (सॉलिड स्टेट ड्राइव्ह) बसवा. SSD मुळे फाईल्स जलद ओपन होतात, विंडोज पटकन लोड होतं आणि संपूर्ण लॅपटॉपचं काम स्मूथ वाटतं. अगदी नवीन लॅपटॉपसारखा फील येईल.
2. रॅम वाढवा आणि मल्टीटास्किंगला तयार व्हा : लॅपटॉपमध्ये कमी RAM असेल, तर एकाच वेळी अनेक अॅप्स चालवल्यावर तो अडखळू लागतो. यावर सोपा उपाय म्हणजे — RAM वाढवा! किमान 8GB RAM लावल्यास तुम्ही वेगवेगळं काम सहज करू शकता. यासोबतच, नको असलेल्या फाइल्स, सॉफ्टवेअर आणि गेम्स डिलीट करून स्टोरेज रिकामं ठेवा, यामुळेही लॅपटॉपचा वेग वाढतो.
3. सतत अपडेट ठेवा आणि व्हायरसपासून वाचवा : लॅपटॉपचं सॉफ्टवेअर अपडेट केल्यास त्यातल्या त्रुटी दूर होतात आणि स्पीडही सुधारतो. शिवाय, व्हायरस किंवा मालवेअरमुळे सिस्टम स्लो होण्याची शक्यता असते, म्हणून नेहमी चांगलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे.
4. स्टार्टअप प्रोग्राम्सवर नियंत्रण ठेवा : लॅपटॉप ऑन केल्यावर काही अॅप्स आपोआप सुरू होतात, यामुळे सुरुवातीला वेळ लागतो. हे अॅप्स टास्क मॅनेजरमध्ये जाऊन डिसेबल करा. याशिवाय, टेम्प फाइल्स वेळोवेळी डिलीट करत राहा — यामुळे स्टोरेज हलकं राहतं आणि लॅपटॉप वेगवान काम करतो.