‘एसी लावला घरा तरी घामाच्या धारा’… चांगल्या कुलिंगसाठी ‘ही’ घ्या पंचसूत्री…

अनेकदा एसी लावूनही रूम पाहिजे तशी कुलिंग होत नाही. आधीच वाढत्या तापमानामुळे बेहाल झालेले असताना त्यात एसीदेखील काम करीत नसल्याने मनस्ताप होणे साहजिकच असते. परंतु अनेकदा यात मशिनचा दोष कमी असतो. आपल्या चुकीच्या सवयी बहुतांशी याला कारणीभूत ठरत असतात.

‘एसी लावला घरा तरी घामाच्या धारा’... चांगल्या कुलिंगसाठी ‘ही’ घ्या पंचसूत्री...
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 9:36 AM

सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. मान्सून वेशीवर आला असला तरी अजूनही महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान (Temperature) चाळीशीच्या जवळपास आहे. त्यामुळे अतिशय गर्मी होत आहे. गर्मीपासून आराम मिळविण्यासाठी लोक कुलरचा आसरा घेत आहे. परंतु तीव्र तापमानामुळे पंखा, कुलरदेखील काम करीत नसल्याने अनेक जण आपल्या घरात एअर कंडिशनर (AC) बसवतात. किमान आतातरी वाढत्या गर्मीपासून आराम मिळेश अशी आशा व्यक्त करीत असतानाच पुन्हा भ्रमनिरास होताना दिसून येतो. अनेक लोकांना एसीच्या योग्य वापराची माहिती नसल्याने त्यांना एसी लावूनही रुममध्ये कुलिंग (cooling) मिळत नाही. आपण नेहमी एसी लावल्यावर काही चुका करतो, त्यामुळे रुममध्ये पाहिजे तशी कुलिंग मिळत नाही. आज या लेखात त्याची माहिती घेणार आहोत.

1) खिडक्या, दरवाजा बंद ठेवा

एसीच्या कुलिंगचा आनंद घेण्यासाठी तो लावताच पहिल्यांदा सर्व दरवाजे, खिडक्या पूर्णपणे बंद करणे आवश्‍यक असते. ते उघडे असतील तर सर्व हवा बाहेर जाईल व तुम्हाला रुममध्ये पाहिजे तशी कुलिंग मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

2) एक्सोस्टला बंद करावे

एसीला लावताच रुममधील किंवा डायनिंग हॉलमधील एक्सोस्ट फॅनला ताबडतोब बंद करावे. नाहीतर एसीची थंड हवा रूमच्या बाहेर फेकली जाईल व तुम्हाला कुलिंग मिळणार नाही.

3) पंखा सुरु करावा

एसीला ऑन केल्यानंतर वापरकर्त्यांनी आपल्या पंख्यांनाही ऑन करणे आवश्यक आहे. पंखा ऑन केल्याने एसीची हवा संपूर्ण रुममध्ये पसरते. त्यामुळे तुम्हाला चांगली कुलिंग मिळण्यास मदत होत असते.

४) एसीच्या फिल्टर्सला नेहमी स्वच्छ ठेवा

एसी फिल्टर्सला नेहमी स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे त्याला चांगला स्पीड मिळतो, शिवाय कुलिंगदेखील चांगली होते. जर फिल्टर घाण झाले असेल तर एसीमध्ये लिकेजची समस्या निर्माण होते.

५) नियमित सर्व्हिसिंग करा

एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वर्षानुवर्षे त्याची डागडुज्जी करत नसाल तर, अशाने तो नीट काम करीत नाही, व परिणामी पाहिजे तशी कुलिंग मिळत नाही. अनेकदा कुलिंग कॉइलदेखील लिक होऊ शकतात.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.