Meta Threads : थ्रेड्सने गाडला झेंडा, युझर्सची संख्या इतक्या कोटींवर, ट्विटरचे ट्रॅफिक डाऊन

Meta Threads : थ्रेड्स ॲपने ट्विटरचे तोंडचे पाणी पळवले आहे. रात्रीतूनच इतक्या लाख युझर्सने हे ॲप डाऊनलोड केले. ट्विटरला त्याचे मननमानी प्रयोग अंगलट आले आहे. ट्विटरचे ट्रॅफिक डाऊन झाल्याने एलॉन मस्कची झोप उडाली आहे.

Meta Threads : थ्रेड्सने गाडला झेंडा, युझर्सची संख्या इतक्या कोटींवर, ट्विटरचे ट्रॅफिक डाऊन
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:43 AM

नवी दिल्ली : मेटाने बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेत वेळेवर ट्विटरवर घाव घातला आहे. मेटाने नुकतेच ट्विटरला टफ फाईट देण्यासाठी थ्रेड्स ॲप (Threads App) बाजारात उतरवले आहे. थ्रेड्सचा वणवा रात्रीतूनच पसरला. रात्रीतूनच लाखो युझर्सने हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यामुळे ट्विटरच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ट्विटरने गेल्या वर्षभरात अचाट प्रयोग केले. त्यामुळे युझर्स ट्विटरवर नाराज होते. एलॉन मस्कच्या एककल्ली स्वभावाचा मोठा फटका ट्विटरला सहन करावा लागणार आहे. थ्रेड्सच्या झपाट्यासमोर ट्विटर कसे तग धरते हे पाहणे गरजेचे आहे. सध्या ट्विटरचे (Twitter) ट्रॅफिक डाऊन झाल्याने एलॉन मस्कची झोप उडाली आहे.

भावा, एकदम सूसाट मेटाने (Meta) गेल्या आठवड्यात 100 देशांतील आयओएस आणि अँड्रॉईड युझर्ससाठी थ्रेड्स ॲप (Threads App) बाजारात उतरवले. इंस्टाग्राम प्रोफाइलवर दिसणार्‍या बॅजच्या संख्येच्या आधारावर सध्या थ्रेड्स ॲप वर 9.7 कोटींहून अधिक अकाऊंट्स तयार झाल्याचे दिसत आहे. तर या ॲपची घोषणा होताच केवळ दोन तासांतच 20 लाख लोकांनी खाते उघडले होते. तर 7 तासात 1 कोटी युझर्सची झुंबड उडाली. पुढील केवळ 12 तासांत ही संख्या 3 कोटींच्या पुढे गेली. युझर्सची संख्या एक एक रेकॉर्ड करत आहे.

ट्विटरवर नाराजी एलनॉ मस्क याने ट्विटरची मालकी घेतल्यापासून त्याच्या लहरीपणाचा युझर्सला मोठा फटका बसला. ट्विटरच्या वापरासाठी, ब्लू टिकसाठी त्याने धंदेवाईक व्यवहाराला सुरुवात केल्याने युझर्स त्याच्यावर नाराज होते. त्याचवेळी अनेकांनी ट्विटरचा वापर कमी केला अथवा बंद केला होता. त्यात एक-एका तुघलकी निर्णयाची भर पडतच गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबतच युझर्स ट्विटरला पर्याय शोधत होते.

हे सुद्धा वाचा

ट्विटरला धोबीपछाड क्लाउडफ्लेयरचे सीईओ मॅथ्यू प्रिंस यांनी जानेवारी ते आतापर्यंत ट्विटरच्या युझर्सची संख्या कशी घटत केली याचा एक आलेख शेअर केला आहे. त्यात लोकांची नाराजी स्पष्ट दिसून आली. इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी अर्थात या सोशल वॉरवर स्पष्ट मत मांडले होते. ट्विटरला रिप्लेस करण्यासाठी थ्रेड्स आणण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तर ज्यांनी ट्विटरचा आयुष्यात कधीच वापर केला नाही, असे युझर्संना एक सार्वजनिक मंच उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

थ्रेड्समध्ये अनेक सुविधांचा अभाव थ्रेड्स एप्लिकेशनमध्ये (Threads App) अजून अनेक अपडेट्स यायची आहेत. सध्या डायरेक्ट मॅसेज, फॉलोईंग फीड, फुल वेब व्हर्जन, क्रॉनोलॉजिकल फीड आणि इतर अनेक सुविधांचा अभाव आहे. तरीही युझर्सचा या पाऊस पडला आहे. युझर्सचा पूर आला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.