30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

Mi Smarter Living 2022 या कार्यक्रमादरम्यान शाओमी कंपनीने दोन नवीन लॅपटॉप, Mi Band 6, Mi TV 5X आणि आणखी काही उत्पादनं लाँच केली आहेत.

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत...
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 6:01 PM

मुंबई : Xiaomi ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. Mi नोटबुक प्रो आणि Mi नोटबुक अल्ट्रा हे दोन्ही लॅपटॉप्स गुरुवारी दुपारी Mi Smarter Living 2022 या कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले. या इव्हेंटदरम्यान कंपनीने Mi Band 6, Mi TV 5X आणि आणखी काही उत्पादनं लाँच केली आहेत. (Mi Band 6 launches in India with 30 fitness modes, SpO2 monitoring feature, know price and features)

भारतात Mi Band 6 ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. बँडची किंमत Mi Band 5 पेक्षा जास्त आहे आणि रेडमी वॉचइतकीच आहे. एमआय बँड 6 एक इंटरचेंजेबल स्ट्रॅपसह येतो जो सहा वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, यात ब्लॅक, ऑरेंज, ऑलिव्ह, यलो, आयवरी आणि ब्लू या रंगांचा समावेश आहे. सर्व स्ट्रॅप स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागतील. फिटनेस बँडमध्ये 1.56-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त बँड फेसेस आहेत जे Mi Wear अॅप वापरून कस्टमाइज केले जाऊ शकतात. हा Android आणि iOS दोन्हीला सपोर्ट करतो.

Mi Band 6 मध्ये 30 फिटनेस मोड आहेत. बँड SpO2 मॉनिटरिंग देखील ऑफर करतो ज्याद्वारे आपण आपल्या बल्ड-ऑक्सिजनची पातळी मोजू शकतो. Mi Band 6 स्लीप ट्रॅकिंगसह येतो. यात हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 फीचर आहे. फिटनेस बँड एकूण 14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह सादर करण्यात आला आहे. हा बँट 5ATM वॉटर रसिस्टेंट आहे.

Mi नोटबुक अल्ट्रा आणि नोटबुक प्रो ची किंमत

हे सेकेंड जनरेशन Mi नोटबुक लॅपटॉप आहेत आणि ते गेल्या वर्षीच्या Mi Notebook 14 ची जागा घेतील. शाओमीने आधीच पुष्टी केली आहे की नवीन लाइन-अप गेल्या वर्षीच्या सिरीजची जागा घेईल. याचा अर्थ असा की Mi नोटबुक 14 सिरीजमधील सर्व मशीन फक्त स्टॉक संपेपर्यंत विकल्या जातील. भारतात Mi Notebook Pro ची किंमत कोर i5 प्रोसेसरसह 8GB रॅम व्हेरिएंटसाठी 56,999 रुपये, कोर i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये आणि कोर i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 72,999 रुपये इतकी आहे. भारतात Mi Notebook Ultra ची किंमत Core i5 प्रोसेसर असलेल्या 8GB RAM व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये, Core i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 63,999 रुपये आणि Core i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 76,999 रुपये इतकी आहे.

Mi नोटबुक अल्ट्रा चे फीचर्स

Mi Notebook Ultra हे दोन्ही लॅपटॉपमध्ये अधिक प्रीमियम आहे. यात 15.6-इंच 3.2k (किंवा WQHD+) डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 16:10 आस्पेक्ट रेश्योसह येतो. त्याचा पीक ब्राईटनेस 300 nits इतका आहे. लॅपटॉप डीसी डिमिंगला सपोर्ट करतो. हे दोन GPU पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. युजर्स येथे 11 व्या जनरेशन इंटेल टायगर लेक कोर i5 किंवा कोर i7 व्हेरिएंटपैकी एक निवडू शकतात. 8 जीबी किंवा 16 जीबी रॅम या दोनपैकी एक रॅम निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या लॅपटॉपची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512GB इतकी आहे.

लॅपटॉपचे वजन 1.7 किलो आहे आणि त्याची जाडी 17.9 मिमी आहे. हा लॅपटॉप सिंगल लस्ट्रस ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, यात बॅकलिट कीबोर्ड आणि बिल्ट-इन 720p वेबकॅम आहे. शाओमीने पॉवर बटणाच्या वर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी 3.2 जेन 1 पोर्ट, एक यूएसबी 2.0 पोर्ट आणि एक एचडीएमआय पोर्ट मिळेल. 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील आहे. यामध्ये डीटीएस ऑडिओ सपोर्टसह दोन 2W स्पीकर सिस्टीमद्वारे ऑडिओची व्यवस्था केली आहे. लॅपटॉप 70WHr बॅटरी पॅक आहे जो 12 तासांचा बॅकअप देतो. सोबत 65W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

Mi नोटबुक प्रो चे फीचर्स

Mi नोटबुक प्रो मध्ये अल्ट्रा व्हेरिएंट सारखीच वैशिष्ट्ये आहेत. तथापि, याचा 14-इंच IPS अँटी-ग्लेअर डिस्प्लेसह 2.5k रिझोल्यूशन आणि 16:10 आस्पेक्ट रेश्योसह येतो. जो 60Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 56WHr ची बॅटरी वापरली गेली आहे, जी 11 तासांचा बॅकअप देईल, असा दावा केला जात आहे.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Mi Band 6 launches in India with 30 fitness modes, SpO2 monitoring feature, know price and features)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.