Core i7 प्रोसेसरसह Mi नोटबुक प्रो, नोटबुक अल्ट्रा भारतात लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Xiaomi ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. Mi नोटबुक प्रो आणि Mi नोटबुक अल्ट्रा हे दोन्ही लॅपटॉप्स गुरुवारी दुपारी Mi Smarter Living 2022 या कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले.
मुंबई : Xiaomi ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. Mi नोटबुक प्रो आणि Mi नोटबुक अल्ट्रा हे दोन्ही लॅपटॉप्स गुरुवारी दुपारी Mi Smarter Living 2022 या कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले. हे सेकेंड जनरेशन Mi नोटबुक लॅपटॉप आहेत आणि ते गेल्या वर्षीच्या Mi Notebook 14 ची जागा घेतील. शाओमीने आधीच पुष्टी केली आहे की नवीन लाइन-अप गेल्या वर्षीच्या सिरीजची जागा घेईल. याचा अर्थ असा की Mi नोटबुक 14 सिरीजमधील सर्व मशीन फक्त स्टॉक संपेपर्यंत विकल्या जातील. (Mi Notebook Pro, Notebook Ultra Launched in India with Core i7 Processor, Know Prices and Features)
दोन्ही लॅपटॉप Mi Band 6, Mi TV 5X आणि आणखी काही उत्पादनांसह सादर करण्यात आले. सर्व डिवाइसेस एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले. नवीन एमआय नोटबुक लॅपटॉपमध्ये मुख्य अपग्रेड बॅकलिट कीबोर्ड आहे, जो आधीच्या शाओमी लॅपटॉपमध्ये नव्हता. मशीन 3.2k डिस्प्ले आणि 11 जनरेशन इंटेल टायगर लेक प्रोसेसरसह देखील येईल.
Mi नोटबुक अल्ट्रा आणि नोटबुक प्रो ची किंमत
भारतात Mi Notebook Pro ची किंमत कोर i5 प्रोसेसरसह 8GB रॅम व्हेरिएंटसाठी 56,999 रुपये, कोर i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये आणि कोर i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 72,999 रुपये इतकी आहे. भारतात Mi Notebook Ultra ची किंमत Core i5 प्रोसेसर असलेल्या 8GB RAM व्हेरिएंटसाठी 59,999 रुपये, Core i5 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 63,999 रुपये आणि Core i7 प्रोसेसरसह 16GB रॅम व्हेरिएंटसाठी 76,999 रुपये इतकी आहे.
The last but not the least. *drumrolls* ?
Grab your #MiNoteBookUltra starting at ₹59,999 and#MiNoteBookPro starting at ₹56,999#SmarterLiving2022 #FutureIsSmart pic.twitter.com/zyysGff8CH
— Mi India #SmarterLiving2022 (@XiaomiIndia) August 26, 2021
Mi नोटबुक अल्ट्रा चे फीचर्स
Mi Notebook Ultra हे दोन्ही लॅपटॉपमध्ये अधिक प्रीमियम आहे. यात 15.6-इंच 3.2k (किंवा WQHD+) डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 16:10 आस्पेक्ट रेश्योसह येतो. त्याचा पीक ब्राईटनेस 300 nits इतका आहे. लॅपटॉप डीसी डिमिंगला सपोर्ट करतो. हे दोन GPU पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. युजर्स येथे 11 व्या जनरेशन इंटेल टायगर लेक कोर i5 किंवा कोर i7 व्हेरिएंटपैकी एक निवडू शकतात. 8 जीबी किंवा 16 जीबी रॅम या दोनपैकी एक रॅम निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या लॅपटॉपची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512GB इतकी आहे.
लॅपटॉपचे वजन 1.7 किलो आहे आणि त्याची जाडी 17.9 मिमी आहे. हा लॅपटॉप सिंगल लस्ट्रस ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, यात बॅकलिट कीबोर्ड आणि बिल्ट-इन 720p वेबकॅम आहे. शाओमीने पॉवर बटणाच्या वर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी 3.2 जेन 1 पोर्ट, एक यूएसबी 2.0 पोर्ट आणि एक एचडीएमआय पोर्ट मिळेल. 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील आहे. यामध्ये डीटीएस ऑडिओ सपोर्टसह दोन 2W स्पीकर सिस्टीमद्वारे ऑडिओची व्यवस्था केली आहे. लॅपटॉप 70WHr बॅटरी पॅक आहे जो 12 तासांचा बॅकअप देतो. सोबत 65W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
Don’t fret about powercuts now because we’ve got a battery that’s got you covered for really long ?.
Give us a ♥ if you love it. #MiNoteBookPro #SmarterLiving2022 #FutureIsSmart pic.twitter.com/sfAr44Phrx
— Mi India #SmarterLiving2022 (@XiaomiIndia) August 26, 2021
Mi नोटबुक प्रो चे फीचर्स
Mi नोटबुक प्रो मध्ये अल्ट्रा व्हेरिएंट सारखीच वैशिष्ट्ये आहेत. तथापि, याचा 14-इंच IPS अँटी-ग्लेअर डिस्प्लेसह 2.5k रिझोल्यूशन आणि 16:10 आस्पेक्ट रेश्योसह येतो. जो 60Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 56WHr ची बॅटरी वापरली गेली आहे, जी 11 तासांचा बॅकअप देईल, असा दावा केला जात आहे.
इतर बातम्या
आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही
108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल
50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(Mi Notebook Pro, Notebook Ultra Launched in India with Core i7 Processor, Know Prices and Features)