Micromax : मायक्रोमॅक्सचा ‘हा’ बजेटफोन लवकरच लाँच होणार, किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घ्या

मायक्रोमॅक्स लवकरच आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवीन स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन 2सी च्या नावाने लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.

Micromax : मायक्रोमॅक्सचा ‘हा’ बजेटफोन लवकरच लाँच होणार, किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घ्या
मायक्रोमॅक्सचा ‘हा’ बजेटफोन लवकरच लाँच होणारImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 11:17 AM

यंदा 2022 वर्षाच्या सुरुवातीपासूनच ओप्पो, सॅमसंग, रेडमी आदी मोठ्या कंपन्या आपले स्मार्टफोन बाजारात लाँच करीत आहेत. यंदा कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये (Budget) असणाऱ्या तसेच चांगले स्पेसिफिकेशन असलेल्या स्मार्टफोनच्या लाँचिंगला प्राधान्य दिले आहे. भारतीय मोबाईल कंपनी असलेली मायक्रोमॅक्स भारतातील आपला सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन 2सी (micromax in 2c) च्या नावाने लाँच केला जाऊ शकतो. याला 2बी सिरीजमधील मायक्रोमॅक्सचे नवीन व्हर्जन मानले जात आहे. टिपस्टर सुधांशू अंभोरे यांच्या ट्वीटमध्ये (Tweet) या मोबाईलची डिझाईन आणि कलर व्हेरिएंट दिसून आले आहे. 2सीमध्ये मायक्रोमॅक्सचे डिझाईन 2बी च्या जवळपास सारखेच दिसून येत आहे. हा मोबाईल ब्लॅक, ब्राउन आण मरुन शेडमध्ये उपलब्ध आहे.

अशी असेल किंमत

‘प्राइसबाबा’नुसार, 2सी मध्ये मायक्रोमॅक्सच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10 हजार 499 असू शकते. या मोबाईलचा दुसरा व्हेरिएंटदेखील लाँच होण्याची शक्यता आहे. जर या मोबाईलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळाले तर हा मोबाईल भारतातील इतर कंपन्यांच्या स्वस्त दरात मिळत असलेल्या मोबाईलशी चांगली स्पर्धा करु शकतो.

ही आहेत 2सीची स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये बॅक कॅमेरा सेंसरच्या खाली एलईडी फलॅश आहे. स्क्रीनवर वॉटर ड्रोप नॉच पॅनल दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी प्लस डिसप्ले दिलेला आहे. याच रिझॉल्यूशन 720 बाय 1600 पिक्सल असेल. फोनचा डिसप्ले 400 निट्‍सपर्यंत बाइटनेससोबत येईल. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, मागील भागात ड्युअल कॅमरा सेटअप आहे. प्रायमरी लेंस 8 मेगापिक्सल असून बॅक कॅमेरा व्हीजीए सेंसर सोबत येईल. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे. हा मोबाईल UNISOC T610 चिपसेटसोबत उपलब्ध आहे. हा चिपसेट 4 जीबी आणि 6 जीबी LPDDR4× रॅम आणि 64 जीबी eMMC 5.1 इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. इंटरनल स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने एक्सटेंड केले जाउ शकते.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.