मोबाईल सारखा हँग होतोय ? असू शकतात ही 3 कारणं, अशी सोडवा समस्या
तुम्हालाही मोबाईल जास्त हँग होण्याची चिंता वाटत असेल, तर त्याची काही कारणं जाणून घेऊया. फक्त कारणच नाही तर आज आम्ही तुम्हाला या समस्येचे निराकरण करण्याचे उपाय देखील सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.

आजकाल स्मार्टफोन ही फारच गरजेची गोष्ट झाली आहे. कारण आपल्या बहुतेक गोष्टी या फोनवर अवलंबून असतात. पण अशामध्ये अनेकवेळा स्मार्टफोन अचानक सतत हँग होत राहतो, ज्यामुळे कधीकधी त्यांचे काम मध्येच अडकून पडते. तुमचा स्मार्टफोन का हँग होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला मोबाईल फोन हँग होण्याची तीन कारणे सांगणार आहोत, यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्हाला अशी समस्या आली तर तुम्ही ही समस्या कशी सोडवू शकता?
जर फोन हँग होऊ लागला तर मोबाईलचा स्पीड कमी होतो. ज्यामुळे डिव्हाइसच्या कामगिरीवर परिणाम होतो. या परिस्थितीत फोन पुन्हा पुन्हा रीस्टार्ट करावा लागतो. तुमचा फोन हँग होण्याची ३ कारणे कोणती आहेत ते आपण जाणून घेऊयात…
ही आहेत कारणे आणि उपाय
पहिले कारण: जर फोन हँग होत असेल तर मोबाईलमधील रॅम कमी असणे हे त्यामागील एक मोठे कारण असू शकते. जर तुमच्या फोनमध्ये 4 जीबी किंवा त्यापेक्षा कमी रॅम असेल, तर मल्टीटास्किंग दरम्यान तुमचा फोन हँग होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी अशा फोनमध्ये हेवी मल्टीटास्किंग करू नका, प्रथम रॅममधून ते अॅप्लिकेशन काढून टाका ज्याची तुम्हाला आवश्यकता नाही.
दुसरे कारण: जेव्हा फोन स्टोरेज भरलेले असते, तेव्हा अशा परिस्थितीतही मोबाईल हँग होऊ लागतो, ही समस्या टाळण्यासाठी, फोनमध्ये कमी ॲप्स, कमी फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करा. फोटो आणि व्हिडिओ साठवण्यासाठी क्लाउड स्टोरेज वापरणे चांगले, यामुळे स्टोरेज भरत नाही आणि फोनही हँग होत नाही.
तिसरे कारण: जर फोनचा कोणताही फिजिकल पार्ट खराब झाला तर तुमचा फोन हँग होऊ शकतो. केवळ हार्डवेअरच नाही तर ज्या सॉफ्टवेअरवर फोन काम करत आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या असेल तर फोन देखील हँग होऊ लागतो.
जर ऑपरेटिंग सिस्टम किंवा कोणत्याही ॲपमध्ये बग असेल तर कंपनी एक नवीन अपडेट जारी करते जे समस्येचे निराकरण करते. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरमध्ये जा आणि कोणतेही ॲप अपडेट मिळाले आहे का ते तपासा. तसेच फोन सेटिंग्जमध्ये सॉफ्टवेअर अपडेट तपासा.