Electric Car : सिंगल चार्जवर 500 किमीपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज…किआची इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच

किआची इलेक्ट्रिक कार प्रीमिअम फीचर्स आणि जबरदस्त लूकसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये दाखल करण्यात येणार आहे. यातील टॉप व्हेरिएंटची ड्रायव्हिंग रेंज 500 किमीपेक्षा अधिक असणार आहे.

Electric Car : सिंगल चार्जवर 500 किमीपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज...किआची इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच
Electric Car Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:59 PM

मुंबई : किआने मागील आठवड्यातच आपली अपकमिंग ईव्हीच्या बुकिंगला सुरुवात केली होती. आता कंपनी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कारची बुकिंग अमाउंट 3 लाख रुपये ठेवण्यात आली होती. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स (Features) देण्यात आलेले आहेत. किआची ही इलेक्ट्रिक कार (Electric car) प्रीमिअम फीचर्स आणि जबरदस्त लूकसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये दाखल करण्यात येणार आहे. यातील टॉप व्हेरिएंटची ड्रायव्हिंग रेंज 500 किमीपेक्षा अधिक असणार आहे. या कारमध्ये नोएडा ते लखनउ अवघ्या सिंगल चार्जवर जाण्याची क्षमता आहे. दरम्यान, किआ ईव्ही 6 (kia ev 6) एक क्रोओव्हर बॉडी टाइप कार आहे. भारतामध्ये ही कंपनीची पाचवी कार ठरणार आहे. यात, पहिली सेल्टोस, कार्निवल, सोनेट आणि कॅरेंस आदींचा समावेश आहे. आता कोरियन कंपनी आपली पाहिली ईव्ही कार बाजारात उतरवत आहे. किआ भारताच्या आधी जागतिक बाजारात ही नवीन कार लाँच करणार असल्याची माहिती आहे.

किआ ईव्ही 6 चा या कार्सशी स्पर्धा

किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक क्रोसओव्हर कारची स्पर्धा अनेक नवीन कार्सशी होणार आहे. या कारमध्ये वोल्वो एक्ससी 40 रिचार्ज आणि ह्युंडाई आईओनिक 5 अशा प्रीमिअम सेगमेंटच्या ईव्ही कार्सचा समावेश आहे.

भारतात केवळ 100 युनिट्ची विक्री ?

किआ ईव्ही 6 ला भारतात पूर्णपणे बिल्ट युनिटस रुट्‌सच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. कंपनी भारतामध्ये या कारला मर्यादीत स्वरुपात विक्री करणार असल्याची माहिती आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी भारतात या कारचे केवळ 100 युनिट्‌ची विक्री करणार असल्याची माहिती आहे. परंतु अद्याप या वृत्ताला कंपनीकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

दोन व्हेरिएंटमध्ये होणार दाखल

किआ ईव्ही 6 भारतात दोन व्हेरिएंटमध्ये दाखल होणार आहे. ज्यांचे नाव जीटी आणि जीटी लाइन एडब्ल्यूडी व्हर्जन असणार आहे. जीटी व्हर्जनच्या मदतीने युजर्स 229 एचपीची पावर जनरेट करु शकेल. तर 350 एनएमचा पीक टार्क जनरेट करता येणार आहे. दुसरीकडे जीटी लाइन एडब्ल्यूडी व्हर्जन अधिक पॉवरफूल असणार आहे. यात 347 एचपीची पॉवर आणि 605 एनएमचा पीक टार्क जनरेट करता येणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.