Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

मोटोरोलाने गेल्या आठवड्यात मोटो एज 20 (Moto Edge 20) आणि मोटो एज 20 फ्यूजन (Moto Edge 20 Fusion) भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 8:18 PM

मुंबई : मोटोरोलाने गेल्या आठवड्यात मोटो एज 20 (Moto Edge 20) आणि मोटो एज 20 फ्यूजन (Moto Edge 20 Fusion) भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपीय बाजारात Edge 20 सिरीज अधिकृतपण लाँच केली होती, ज्यात मोटो एज 20, मोटो एज 20 लाइट, मोटो एज 20 प्रो यांचा समावेश आहे. तथापि, मोटोरोलाने भारतात फक्त दोन मॉडेल्स लाँच केले आहेत आणि मोटो एज 20 प्रो वगळला आहे, जे लाइन मॉडेलमध्ये सर्वात टॉप व्हेरिएंट होतं. मोटो एज 20 फ्यूजन ही मोटो एज 20 लाइटची रीब्रांडेड आवृत्ती आहे, कारण दोन्ही स्मार्टफोनचे स्पेक्स कमी – अधिक प्रमाणात सारखेच आहेत. (Moto Edge 20 Fusion first sale live on flipkart From today)

मोटो एज 20 ची बाजारात वनप्लस नॉर्ड 2, विवो व्ही 21 आणि ओप्पो रेनो 6 या स्मार्टफोनशी टक्कर होईल. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन Nord CE, Samsung M42, Mi 10i आणि अगदी Redmi Note 10 Pro Max शी स्पर्धा करेल. मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन मिड-बजेट रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्हीमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन

मोटो एज 20 चे 8GB वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन 6 जीबी व्हेरिएंट 21,499 रुपये आणि 8 जीबी रॅम +128 जीबी व्हेरिएंट 22,999 रुपये या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. मोटो एज 20 दोन रंगांमध्ये येतो ज्यात फ्रॉस्टेड पर्ल आणि फ्रॉस्टेड एमराल्डचा समावेश आहे. तर मोटो एज 20 फ्यूजन इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील या दोन रंगांमध्ये येतो. मोटो एज 20 हा फोन 24 ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर मोटो एज 20 फ्यूजन आजपासून (27 ऑगस्ट)विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

फीचर्स

मोटो एज 20 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. मोटो एज हा भारतातील सर्वात पातळ आणि सर्वात हलका 5G फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G, 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. आपण ही स्पेस एक्सपांडदेखील करू शकता.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, मोटो एज 20 मध्ये टेलिफोटो लेन्स आणि 30x डिजिटल झूमसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देखील आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो एज 20 मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे, जी 30 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 10 मिनिटांत 8 तासांची पॉवर देऊ शकतो.

डिस्काऊंट ऑफर

मोटो एज 20 हा फोन फ्लिपकार्टवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी Axis Bank Credit Card द्वारे पेमेंट केलं तर त्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. Bank of Baroda च्या Mastercard debit card ने पहिलं पेमेंट केल्यास ग्राहकांना 10% डिस्काऊंट मिळू शकतो. ICICI Bank, IndusInd Bank च्या Amex Network Card द्वारे पहिलं ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांना 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Moto Edge 20 Fusion first sale live on flipkart From today)

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.