Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

मोटोरोला कंपनी किफायतशीर 5G फोन लाँच करण्याच्या मार्गावर आहे. Kiev असे या फोनचे नाव असणार आहे.

Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 2:58 PM

मुंबई : मोटोरोला (Motorola) कंपनी किफायतशीर 5G फोन लाँच करण्याच्या मार्गावर आहे. Kiev असे या फोनचे नाव असणार आहे. या फोनच्या फिचर्सबाबातची काही माहिती समोर आली आहे. मोटोरोला कंपनी या फोनद्वारे 5 जी मध्ये डेब्यू करत आहे. हा फोन मोटो G 5G + ला टक्कर देणार आहे. या फोनचा एक फोटो लिक झाला आहे. (Moto G 5G specifications revealed ahead of the official launch)

स्लॅशलिक्सने दिलेल्या माहितीनुसार मोटो G 5G मध्ये फुल्ल स्क्रीन डिस्प्लेवाला पंच होल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन स्टॉक अँड्रॉयड UI आणि प्री लोडेड मोटोरोला अॅप्लिकेशन्सवर चालेल. लिक्समध्ये अशी माहिती मिळाली आहे की, या फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटन देण्यात आलं आहे.

XDA डेव्हलपर्सने या फोनच्या स्पेसिफिकेशनबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे. रिपोर्टनुसार मोटो G 5G क्वालकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरवर चालेल. क्वालकॉमने यापूर्वी सप्टेंबरमध्ये हा चिपसेट लाँच केला आहे. स्नॅपड्रॅगन 750G स्नॅपड्रॅगन 730G पेक्षा 20 टक्के अधिक चांगला आहे.

या फोनमध्ये 6.66 इंचांचा डिस्प्ले (2100*1080p) दिला जाणार आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz असेल. फोनमध्ये मागच्या बाजूला तीन कॅमेरे दिले जाणार आहेत. त्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल. 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा (फ्रंट कॅमेरा) दिला जाणार आहे.

फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इतकी इंटर्नल मेमरी (इंटर्नल स्टोरेज स्पेस) दिली जाईल. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. दरम्यान कंपनीने आतापर्यंत फोनची लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही.

संबंधित बातम्या

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Micromax In सिरीज लाँच होण्याच्या मार्गावर, पाहा फर्स्ट लुक

Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

(Moto G 5G specifications revealed ahead of the official launch)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.