8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…

लेनोवोच्या (Lenovo) मालकीची स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोलाने (Motorola) दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत...
Moto G100
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 12:39 PM

मुंबई : लेनोवोच्या (Lenovo) मालकीची स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोलाने (Motorola) दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने त्यांचा सर्वाधिक प्रलंबित स्मार्टफोन मोटो जी 100 (Moto G100) आणि बजेट स्मार्टफोन जी 50 (Moto G50) बाजारात दाखल केला आहे. दरम्यान मोटोरोला एज एस हा स्मार्टफोन जागतिक बाजारात Moto G100 या नावाने लाँच केला जाणार असल्याच्या बातम्या अफवा ठरल्या आहेत. (Moto G100 launched with Snapdragon 870 SoC and Dual selfie camera; Price, specs and features)

एज एस महिनाभरापूर्वी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे, तर जी 50 स्नॅपड्रॅगन 480 वर चालतो. जी सिरीजअंतर्गत कंपनीने अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत त्यात मोटो जी 30 आणि मोटो जी 10 पॉवर (Moto G30 and Moto G10 Power) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच करण्यात आले होते.

Moto G100 आणि Moto G50 ची किंमत

सध्या हे दोन्ही स्मार्टफोन युरोपियन बाजारात बाजारात लाँच केले आहेत. ते भारतात कधी लाँच केले जातील याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मोटो जी 100 (Moto G100) 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी EUR 499.99 (सुमारे 42,500 रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. स्मार्टफोन सुरुवातीला युरोप आणि अमेरिकेत खरेदीसाठी उपलब्ध असेल. मोटो जी 100 तीन कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे.

मोटो जी 50 (Moto G50) अत्यंत स्वस्त किंमतीत बाजारात दाखल केला आहे. युरोपमधील याच्या 4 जीबी व्हेरिएंटसाठी EUR 229.99 (सुमारे 19,500 रुपये) मोजावे लागतील. युरोपियन किंमतींपेक्षा दोन्ही स्मार्टफोन भारतात कमी किंमतीत लाँच केले जाऊ शकतात.

Moto G100 चे स्पेक्स आणि फीचर्स

मोटो जी 100 मध्ये 1,780 × 2,520 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.7 इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90hz च्या हाय रिफ्रेश रेट आणि 21: 9 च्या रेश्योसह येतो. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसीवर चालतो, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह हा फोन लाँच करण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन यामधील स्टोरेज स्पेस 1TB पर्यंत वाढवता येईल.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर मोटो जी 100 मध्ये मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 16 मेगापिक्सलचा वाइड एंगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आहे. विशेष म्हणजे सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर असेल.

Moto G100 मध्ये 20W TurboPower चार्जसह 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाटी 5 जी, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, ब्लूटूथ व्ही 5.1, वाय-फाय 6, जीपीएस आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. मोटो जी 100 साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकसह फीचरसह सादर करण्यात आला आहे.

इतर बातम्या

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

(Moto G100 launched with Snapdragon 870 SoC and Dual selfie camera; Price, specs and features)

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.