स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह Motorola Edge X लवकरच लाँच होणार, गेमर्ससाठी विशेष फीचर्स

मोटोरोला कंपनी मोटोरोला एज (Motorola Edge) सीरीज अंतर्गत आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव मोटोरोला एज एक्स असेल.

स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह Motorola Edge X लवकरच लाँच होणार, गेमर्ससाठी विशेष फीचर्स
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 7:51 AM

मुंबई : मोटोरोला कंपनी मोटोरोला एज (Motorola Edge) सीरीज अंतर्गत आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव मोटोरोला एज एक्स असेल. Lenovo एक्झिक्युटिव्ह ने या आगामी स्मार्टफोनची माहिती शेअर केली आहे, मात्र कंपनीकडून लॉन्चव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मोटोरोलाने या वर्षी ऑगस्टमध्ये मोटोरोला एज एस प्रो आणि मोटोरोला एज लाइट हे दोन एज सिरिज स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Motorola Edge X स्मार्टफोन एज लाइनअपचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. (Motorola Edge X to Launch with Snapdragon 898, Company Executive informed on Weibo)

लेनोवोचे जनरल मॅनेजर Chen Jin यांनी चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबोला सांगितले की, मोटोरोला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, जो मोटोरोला एज एक्स आहे. मात्र, या पोस्टमध्ये स्मार्टफोनबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन गेमिंग ओरिएंटेड स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा आतापर्यंतचा सर्वात लेटेस्ट आणि वेगवान प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर असू शकतो.

Motorola Edge S Pro चे स्पेसिफिकेशन्स

या Motorola स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. याव्यतिरिक्त, युजर्सना OLED डिस्प्ले आणि 144hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. या मोटोरोला फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर मिळेल, ज्यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे.

तसेच, या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4520mAh बॅटरीने सुसज्ज आहे, हा फोन 30W टर्बोचार्जरसह येतो, जो एक वेगवान चार्जर आहे.

Motorola Edge Lite चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge Lite मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 इतके पिक्सेल आहे. तसेच, यात 144 Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आहे, जो 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल्सचा आहे. तसेच 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4,020mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

इतर बातम्या

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

7000 रुपयांच्या डिस्काऊंटसह OnePlus 9 खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळेतय शानदार ऑफर

आता फोनशिवाय WhatsApp वापरता येणार, जाणून घ्या काय आहे नवं फीचर, कधी लाँच होणार?

(Motorola Edge X to Launch with Snapdragon 898, Company Executive informed on Weibo)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.